loader image
[ays_poll id=7]

भालूर : पौष्टिक तृण धान्य विकास कार्यक्रम

Jan 13, 2023


भालूर (वार्ताहर) येथे पौष्टिक तृण धान्य विकास कार्यक्रम २०२३ अंतर्गत बाजरी पिक प्रात्यक्षिक बाबत तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी बाजरी या पिकाचे महत्व आणि बाजारपेठेतील स्थान यावर शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली. 
       शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे.तो  स्वतः बरोबर जगाचेही पोषण करतो त्यामुळे त्याला  स्वतःसाठी आणि जगाची भूक भागविण्यासाठी पौष्टिक अन्न  मिळावे. सर्वांचा सुदृढ शारीरिक आणि मानसिक विकास व्हावा यासाठी सरकारच्या वतीने पौष्टिक तृण धान्य विकास कार्यक्रम २०२३ राबविण्यात येत असून त्याअंतर्गत शेतकऱ्यांनी बाजरी पिकाचे उत्पादन घेऊन आपल्या आहारात बाजरी,ज्वारी यांचा नियमित समावेश करावा.ज्यामुळे मधुमेह,उच्च रक्तदाब,या आजारांवर तसेच कुपोषण कमी करण्यासाठी,गर्भवती महिलांमधील ॲनिमियाचे प्रमाण कमी करण्यासाठी पौष्टिक तृणधान्यांचा आहारातील समावेश अत्यंत महत्वाचा असल्याचे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी जगदीश पाटील यांनी केले.यावेळी कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना बाजरी पिकाच्या बियाण्याचे आणि औषधांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी  सरपंच अर्चना निकम,विक्रम निकम,श्रावण गोरे,राजेंद्र मेंगळ, गणपत निकम,नंदू ईल्हे,शिवाजी ढगे, देविदास निकम,अप्पासाहेब मडके, दत्ता पाबळे,विनायक लहिरे,साईनाथ निकम,कमलेश काळे, मंडळ अधिकारी ई.एम. अंभोरे,पर्यवेक्षक एस.एन.पवार, कृषी सहाय्यक व्ही.एस. तवले,आर.डी.जैन आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.                                                                           प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उन्नयन योजना 
 पौष्टिक तृणधान्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उन्नयन योजनेंतर्गत ३५ टक्के अनुदान असून जास्तीत जास्त १० लाख रुपये अनुदान देय आहे.जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी,महिला बचत गट, बेरोजगार युवकांनी या योजनेचा फायदा घेऊन प्रक्रिया उद्योग उभारावेत कृषी विभागाकडून सदर योजनेसाठी संपूर्ण सहकार्य केले जाईल.—–जगदीश पाटील तालुका कृषी अधिकारी.

फोटो: बाजरी बियाण्याचे वाटप करताना तालुका कृषी अधिकारी जगदीश पाटील,समवेत सरपंच अर्चना निकम आणि उपस्थित शेतकरी


अजून बातम्या वाचा..

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...

read more
.