loader image
[ays_poll id=7]

पुण्यातील कसबापेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी २७ फेब्रुवारीला मतदान तर त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड निवडणुकीच्या तारखा जाहीर

Jan 19, 2023

महाराष्ट्रातील दोन विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली असून कसबापेठ आणि चिंचवड येथे २७ फेब्रुवारीला पोटनिवडणूकीसाठी मतदान होणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. ईशान्य भारतातील त्रिपुरा, मेघालय आणि नागालँडमध्ये विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्रिपुरामध्ये १६ फेब्रुवारी तर मेघालय आणि नागालॅंडमध्ये २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीचा निकाल २मार्च रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

पुण्यातील कसबा पेठच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचे आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्यानंतर या जागा रिक्त होत्या. आता या दोन्ही जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे.

टिळकांची पणतसून म्हणून 1992 मध्ये मुक्ता टिळक यांनी राजकारणात प्रवेश केला होता. त्यानंतर त्या 17 वर्ष नगरसेवक होत्या. अडीच वर्ष त्या पुण्याच्या महापौर होत्या. त्यानंतर २०१९ मध्ये कसबा मतदारसंघातून त्या आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. २२ डिसेंबर रोजी त्यांचे निधन झाले.

पिंपरी-चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे ३ जानेवारी रोजी निधन झाले. लक्ष्मण जगताप हे दीर्घ काळापासून आजारी होते. वयाच्या 59 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लक्ष्मण जगताप यांना कर्करोगाने ग्रासलं होतं. त्यांच्यावर नियमित उपचार सुरु होते. मात्र त्यांची कर्करोगाशी झुंज अपयशी ठरली. लक्ष्मण जगताप हे तीन टर्म पिंपरी-चिंचवडचे आमदार होते.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

  *मनमाड (दि. ११ नोव्हेंबर) - एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मनमाड येथे भारताचे पहिले...

read more
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
.