आम्ही ज्युनिअर इन्स्टिट्यूट च्या माध्यमातून अनेक स्पर्धा आयोजित केल्या आहेत.
बॉडी बिल्डर स्पर्धा, कारखाना प्रिमियम लीग, राज्यस्तरीय कबड्डी, फुटबॉल स्पर्धा, मनमाड मॅरेथॉन या सारख्या अनेक स्पर्धेचे आयोजन केले आहे,झोनल सचिव सतिश भाऊ केदारे यांनी ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड च्या निवडणुकीच्या प्रगती पॅनल च्या प्रचारसभेत बोलत होते.
मनमाड वर्कशॉप मध्ये औद्योगिक शांतता राखण्यासाठी आम्ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले पण काही संघटनांनी निवडणूक बिनविरोध होऊ दिली नाही.असे मत सी.आर.एम.एस.चे सचिव नितीन पवार यांनी दि सेन्ट्रल रेल्वे ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड २३च्या निवडणुकीच्या प्रचारसभेत आपल्या भाषणात म्हणाले.
तसेच या वेळी ओ.बी.सी.असोसिएशनचे कारखाना शाखा चे अध्यक्ष रतन निकम यांनी प्रगती पॅनल ला भरघोस मतांनी विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी प्रचाराचे नाराळ वर्कशॉप मधील जेष्ठ कामगारांच्या हस्ते फोडण्यात आले.
तसेच मनमाड वर्कशॉप मधील अतिप्राचीन देवस्थान महोबा मंदिरात ही नारळ फोडण्यात आले.
सेन्ट्रल रेल्वे मजदूर संघ मनमाड, ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड, ऑल इंडिया ओ बी सी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड यांची युती झाली आहे.या युती तर्फे प्रगती पॅनल तयार करण्यात आला आहे.
प्रगती पॅनल ची पहिली जाहिर सभा मनमाड वर्कशॉप मध्ये टाईम बुथ जवळ पार पडली.
प्रचार सभेच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सभेला सुरुवात करण्यात आली..
यावेळी झोनल सचिव सतिश भाऊ केदारे,सी.आर.एम.एस.चे कारखाना शाखा चे अध्यक्ष प्रकाश बोडके,सी.आर.एम.एस.चे सचिव नितीन पवार, असोसिएशन चे झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविण अहिरे, विजय गेडाम,ओ.बी.सी.एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा चे अध्यक्ष रतन निकम,
आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ही.आर.एम.एस.चे कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष महेंद्र चौथमल यांनी केले तर आभारप्रदर्शन सचिन इंगळे यांनी केले.
यावेळी झोनल सचिव सतिश केदारे,सी.आर.एम.एस.चेकारखाना शाखेचे अध्यक्ष प्रकाश बोडके,रतन निकम आदी चे भाषणे झाली.
प्रगती पॅनल ज्युनिअर इन्स्टिट्यूट निवडणूक 2023-2024 चे अधिकृत उमेदवार
1) किरण वाघ – सेक्रेटरी
2) गणेश हाडपे- खजिनदार
3)शशिकांत अढोकार- संचालक
4) प्रशांत ठोके – संचालक
5) इच्छाराम माळी- संचालक
6) ज्ञानेश्वर आहेर – संचालक
7) विकास अहिरे – संचालक
8) विलास कराड – संचालक
9) साईनाथ लांडगे – संचालक
यावेळी कामगार संघटनेचे कार्यकर्ते, कामगार व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.
मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...