loader image
[ays_poll id=7]

भारतीय संघाच्या प्रशिक्षण शिबिरासाठी आकांक्षा व्यवहारे व साईराज परदेशी यांची निवड

Jan 21, 2023

आगामी आंतरराष्ट्रीय युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेच्या पूर्व तयारी साठी भारतीय संघाच्या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन भारतीय क्रीडा प्राधिकरण पतियाळा येथे करण्यात आले आहे
दुर्रेस अल्बेनिया येथे 25 मार्च ते 1 एप्रिल 2023 दरम्यान होणाऱ्या जागतिक युथ वेटलिफ्टिंग स्पर्धे साठीचा भारतीय संघ सदर प्रशिक्षण शिबिरातून निवडला जाणार आहे
नुकत्याच नागरकोईल येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेतील उत्तुंग कामगिरीच्या आधारावर गुरु गोबिंद सिंग हायस्कुलची आकांक्षा किशोर व्यवहारे हिची 45 किलो वजनी गटासाठी व के आर टी विद्यालयाचा साईराज राजेश परदेशी याची 73 किलो वजनी गटासाठी भारतीय वेटलिफ्टिंग महासंघाच्या वतीने निवड करण्यात आली आहे दोन्ही खेळाडू सध्या औरंगाबाद च्या भारतीय क्रीडा प्राधिकरणात सराव करीत आहे
यशस्वी खेळाडूंना छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे
जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील मोहन अण्णा गायकवाड डॉ सुनील बागरेचा प्रा दत्ता शिंपी छत्रे विद्यालयाचे आधारस्तंभ पी जी धारवाडकर अध्यक्ष पी जे दिंडोरकर संचालक नाना कुलकर्णी प्रसाद पंचवाघ मुख्याध्यापक आर एन थोरात उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे पर्यवेक्षिका सौ पोतदार एस एस के आर टी विद्यालयाचे प्राचार्य मुकेश मिसर मुख्याध्यापक दीपक व्यवहारे श्री गुरु गोविंद सिंग हायस्कुल चे अध्यक्ष बाबा रणजित सिंहजी प्राचार्य सदाशिव सुतार महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे उपाध्यक्ष संतोष सिंहासने सचिव प्रमोद चोळकर यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या

अजून बातम्या वाचा..

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

  मनमाड :- रोटरी क्लब ऑफ मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड च्या...

read more
मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड, प्रतिनिधी, ता. २८ – मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास...

read more
सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
.