loader image
[ays_poll id=7]

संस्कृती संवर्धन समितीचा ‘वक्तशिर श्रोता पुरस्कार वितरण’ कार्यक्रम संपन्न

Jan 24, 2023

मनमाड : ( योगेश म्हस्के ) संस्कृती संवर्धन समिती तर्फे दरवर्षी 10 ते 12 जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या स्वामी विवेकानंद व्याख्यानमाले मध्ये दरवर्षी व्याख्यानाच्या वेळेच्या आधी येणाऱ्या श्रोत्यांसाठी ‘वक्तशीर श्रोता पुरस्कार’ देण्यात येत असतो.

या श्रोत्यांची निवड ही व्याख्यानाच्या तीनही दिवस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते चिठी काढुन करण्यात येत असते, अशा पद्धतीचा उपस्थित श्रोत्यांना ‘वक्तशरी श्रोता पुरस्कार’ देणारी संस्कृती संवर्धन समिती ही एकमेव संस्था असावी.हा पुरस्कार सोहळा मनमाड येथील सुमन एंटरप्राइजेस यांच्या सौजन्याने घेण्यात येत असतो.यंदाच्या वर्षीचा वक्तशीरी श्रोता पुरस्कार सोहळा हा आज सुमन एंटरप्राइजेस येथे संपन्न झाला.यंदाच्या वर्षीचे हे पुरस्कार १० तारखेला अनुक्रमे १)श्रावणी पुरंदरे २) श्री विवेक हातेकर ३)श्री हेमंत पेंडसे ११ तारखेला १) सौ. मीना कुलकर्णी २)सौ. धारवाडकर ३) सौ. मीना पाराशरे व १२ तारखेला १)श्री विवेक हातेकर २) श्री गजानन क्षीरसागर ३) श्री उमेश कुलकर्णी या तीन दिवसांच्या प्रत्यक्ष वेळेपूर्वी उपस्थित असणाऱ्या भाग्यवान श्रोत्यांना प्राप्त झाला.

या कार्यक्रमास सुमन एंटरप्राइजेसचे संचालक बबन सांगळे यांचे सौजन्य प्राप्त झाले आहे पुरस्कार वितरण कार्यक्रमास मान्यवर सर्वश्री चांदूभाऊ गोगड , सुभाष नहार , प्रकाश गवळी , विकास काकडे , प्रकाश जैन , प्रदीप बोगावत , संस्कृती संवर्धन समितीचे प्रविण व्यवहारे , प्रमोद मुळे , रमाकांत मंत्री , प्रसाद दिंडोरकर , रत्नाकर घोंगडे , आनंद काकडे , महेश नावरकर , अभिजित रसाळ , योगेश म्हस्के आदी सदस्य उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

याप्रसंगी मंचावर नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते. नागरी सत्कार...

read more
मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

  मनमाड:-आपल्या नांदगाव तालुक्याचे लोकप्रिय,कार्यसम्राट, पाणीदार, क्रीडासम्राट दमदार आमदार...

read more
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून व हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या...

read more
.