loader image
[ays_poll id=7]

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये प्रजासत्ताक दिन साजरा

Jan 26, 2023


मनमाड : एच.ए.के. हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज मध्ये ७४ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मालेगाव मधिल प्रतिष्ठित व्यक्ती व संस्थेचे ज्येष्ठ संचालक हाजी इब्राहिम सुपारीवाले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष हाजी सलीम अहमद गाजीयानी सचिव हज्जन सायराबानो सलीम अहमद संस्थेचे सदस्य आदिलभाई गजियानी,अब्दुल करीम गजियानी,आयशा सलीम गजियानी मॅडम,सादिकभाई पठाण, डॉ. मोहम्मद हनिफ (मालेगाव), तुबा मॅडम, तहेरीम गणी मेमन उपस्थित होते. आलेल्या सर्व मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष हाजी सलीम अहमद गाजीयानी होते. ध्वजारोहणा नंतर शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थीनीनी परेड मार्च केले तसेच विद्यार्थीनींनी प्रजासत्ताक दिनानिमित्त भाषण व देशभक्तीपर गीत सादर केले. यावेळी शाळेची व कनिष्ठ महाविदयालयाची माजी विद्यार्थीनी बुशरा गुलाम पठाण हिचे एम.बी.बी.एस. करीता निवड झाल्याबद्दल तिला प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले व इ.१२ वी विज्ञान शाखेचा विद्यार्थी अयान बाबुलाल शेख याने संस्थेचे संस्थापक हाजी अहमद सेठ यांची हुबेहुब प्रतिमा रेखाचित्र कागदावर बनविल्याबद्दल त्याचे प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच नाशिक जिल्हास्तरीय उपक्रमशील शिक्षकेत्तर पुरस्कार शाळेतील प्रयोगशाळा सहाय्यक शेख जावीद मुश्ताक यांना मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष हाजी सलीम अहमद गाजीयानी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सांस्कृतीक मंडळाने केले. कार्यक्रमाचे नियोजन संस्थेचे संचालिका आयशा गाजीयानी मॅडम यांनी केले. उपस्थित सर्व विदयार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष हाजी सलीम अहमद गाजीयानी यांच्या तर्फे चॉकलेट चे पाकीटे वाटप करण्यात आले. मुख्याध्यापक श्री. भूषण दशरथ शेवाळे, संस्था व शाळा समन्वयक अमोल निकम सर पर्यवेक्षक अन्सारी शाहीद अख्तर, शेख आरीफ कासम यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे आभार मानले.


अजून बातम्या वाचा..

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

मनमाड - भारतीय जनता पार्टी देश स्तरावर विविध क्षेत्रामध्ये काम करीत असते कामगार क्षेत्रामध्ये...

read more
.