Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

नियंत्रण सुटल्याने कार झाडावर आदळून महिलेचा मृत्यू तर तीन गंभीर

Jan 28, 2023

दरेगाव – मनमाड मालेगाव महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास कुंदलगाव शिवारात कार अपघातात येवला येथील सिमा प्रमोद केदार यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

येवला तालुक्यातील चिचोंडी वीज उपकेंद्रांचे उप अभियंता प्रमोद केदार हे आपल्या पत्नी व मुलांसह मालेगाव हून येवल्याकडे कार क्रमांक एम एच ४१,ए झेड ००४० ने जात होते. याचवेळी कुंदलगावजवळ एका वळणावर त्यांचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार एका झाडावर आदळली. या अपघातात अभियंता प्रमोद केदार यांच्या पत्नी सिमा केदार जागीच ठार झाल्या. तर स्वतः प्रमोद केदार व त्यांची मुलगा व मुलगी गंभीर जखमी आहेत . या अपघातानंतर जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले जखमींना पुढील उपचारासाठी नाशिक येथे दाखल करण्यात आले आहे.
यावेळी घटनास्थळी पोलिस हवालदार पालवी, उत्तम गोसावी यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला.

अजून बातम्या वाचा..

महाविकास आघाडीला सर्वोच्च न्यायालयाचा दणका : येत्या २ आठवड्यात निवडणुका जाहीर करण्याचे निर्देश

महाविकास आघाडीला सर्वोच्च न्यायालयाचा दणका : येत्या २ आठवड्यात निवडणुका जाहीर करण्याचे निर्देश

मुदत संपलेल्या महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम येत्या २ आठवड्यात...

read more
श्री नेमिनाथ जैन ब्राह्मचर्याश्रम संचलित श्री एच.एच.जे.बी.तंत्रनिकेतनात कन्स्ट्रो 2022 स्पर्धा व फन फेअर ISTE विद्यार्थी अध्याय आणि CESA अंतर्गत कार्यक्रम संपन्न.

श्री नेमिनाथ जैन ब्राह्मचर्याश्रम संचलित श्री एच.एच.जे.बी.तंत्रनिकेतनात कन्स्ट्रो 2022 स्पर्धा व फन फेअर ISTE विद्यार्थी अध्याय आणि CESA अंतर्गत कार्यक्रम संपन्न.

चांदवड येथील श्री नेमिनाथ जैन ब्राह्मचर्याश्रम संचलित श्री एच.एच.जे.बी.तंत्रनिकेतनातील सिव्हील...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]