Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

नियंत्रण सुटल्याने कार झाडावर आदळून महिलेचा मृत्यू तर तीन गंभीर

Jan 28, 2023

दरेगाव – मनमाड मालेगाव महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास कुंदलगाव शिवारात कार अपघातात येवला येथील सिमा प्रमोद केदार यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

येवला तालुक्यातील चिचोंडी वीज उपकेंद्रांचे उप अभियंता प्रमोद केदार हे आपल्या पत्नी व मुलांसह मालेगाव हून येवल्याकडे कार क्रमांक एम एच ४१,ए झेड ००४० ने जात होते. याचवेळी कुंदलगावजवळ एका वळणावर त्यांचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार एका झाडावर आदळली. या अपघातात अभियंता प्रमोद केदार यांच्या पत्नी सिमा केदार जागीच ठार झाल्या. तर स्वतः प्रमोद केदार व त्यांची मुलगा व मुलगी गंभीर जखमी आहेत . या अपघातानंतर जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले जखमींना पुढील उपचारासाठी नाशिक येथे दाखल करण्यात आले आहे.
यावेळी घटनास्थळी पोलिस हवालदार पालवी, उत्तम गोसावी यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला.

अजून बातम्या वाचा..

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या आमरण उपोषण करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा लक्ष्मी नगर (वाडी) व मांडवड येथे जाहीर सत्कार

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या आमरण उपोषण करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा लक्ष्मी नगर (वाडी) व मांडवड येथे जाहीर सत्कार

मराठा समाजाच्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी युवराज संभाजी राजे छत्रपती यांनी...

read more
कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित ग्राहकांसाठी महावितरणची विलासराव देशमुख अभय योजना;ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची घोषणा

कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित ग्राहकांसाठी महावितरणची विलासराव देशमुख अभय योजना;ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची घोषणा

महावितरणची आर्थिक परिस्थिती सध्या अत्यंत बिकट आहे. या बिकट परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी ९ हजार...

read more
मनमाड महाविद्यालयात कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या जयंती निमित्त ‘बौद्धिक स्वामित्व हक्क’ या विषयावर कार्यशाळा संपन्न

मनमाड महाविद्यालयात कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या जयंती निमित्त ‘बौद्धिक स्वामित्व हक्क’ या विषयावर कार्यशाळा संपन्न

महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात महात्मा गांधी विद्यामंदिर...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]