loader image
[ays_poll id=7]

राजस्थान आणि मध्यप्रदेशात विमाने कोसळली

Jan 28, 2023

मध्य प्रदेशातील मोरेनाजवळ सुखोई-30 आणि मिराज 2000 अशी दोन विमाने आज पहाटेच्या वेळेस कोसळली. माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही विमानांनी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर एअरबेसवरून उड्डाण केले, जेथे सराव सुरू होता. या घटनेबाबत संरक्षणमंत्र्यांनी हवाई दल प्रमुखांशी चर्चा केली आहे.

माहिती देताना मुरैनाचे जिल्हाधिकारी म्हणाले की, जेट विमान पहाटे साडेपाच वाजता कोसळले. दोन्ही पायलट सुखरूप बाहेर पडले. या अपघातानंतर हवाई दलाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरी स्थापन केली आहे. दोन्ही विमाने एकमेकांवर आदळली की आणखी काही कारणामुळे अपघात झाला याची चौकशी केली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातादरम्यान सुखोई 30 मध्ये दोन पायलट होते तर मिराज 2000 मध्ये एक पायलट होता. दोन पायलट सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे तर हवाई दलाचे हेलिकॉप्टर तिसऱ्या पायलटच्या ठिकाणी पोहोचले आहे.

राजस्थामध्ये विमान दुर्घटना दुसरीकडे, प्राथमिक माहितीनुसार राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यात शनिवारी सकाळी चार्टर्ड विमान कोसळले. जिल्हाधिकारी अशोक रंजन यांनी दुजोरा दिला आहे. पोलिस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जीवितहानी झाल्याची कोणतीही माहिती अजून मिळालेली नाही. भरतपूरच्या उचैन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. हे विमान हवाई दलाचे आहे की लष्कराचे हे अद्याप निश्चित झालेले नाही. दुसरीकडे भरतपूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक श्याम सिंह यांनी सांगितले की, सध्या हे लहान विमान असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अजून स्पष्टता नाही. त्याचा आकाशातच स्फोट झाला होता. कोणाचा मृत्यू झाला आहे की नाही याची संपूर्ण चौकशी सुरू आहे.

अजून बातम्या वाचा..

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या...

read more
रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

  दिनांक 17 मंगळवार रोजी अनकाई येथे रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक आणि रोटरी आय हॉस्पिटल मालेगाव...

read more
महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

  मनमाड :- महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड,...

read more
व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

मनमाड -- मनमाड शहर व्यापारी महासंघ चे अध्यक्ष राजाभाऊ पारीक तसेच त्यांचे लहान बंधू अनिल पारीक व...

read more
.