loader image
[ays_poll id=7]

पोलिसांच्या जाचाला कंटाळून सराफ व्यावसायिकाची आत्महत्या

Jan 29, 2023

नाशिक रोड : येथील सराफ व्यावसायिकाने मुंबई पोलिसांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. चोरीचे सोने घेतल्याचा आरोप पोलिसांनी या सराफावर केला होता. या घटनने परिसरात खळबळ माजली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे.
येथील रहिवासी असलेले सराफ व्यवसायिक दीपक कमलाकर दुसाने यांचे परिसरातील देवी चौकात दुसाने बंधु नावाने दुकान आहे. उल्हासनगर येथील पोलिसांनी वारंवार चोरीचे सोने घेतल्याचा आरोप करत त्रास दिल्याने त्यांनी राहत्या घरी आत्महत्या केली अशी माहिती मृत दीपक दुसाने यांचे काका कालिदास दुसाने यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

कालिदास दुसाने यांनी माध्यमांना सांगितले कि, २३ तारखेला दीपक यांच्या दुकानात ठाणे येथून पोलिस आले व त्यांनी दीपक यांच्यावर चोरीचे सोने घेतल्याचा आरोप केला. व त्याची भरपाई म्हणून २ लाख ९० हजार रोख तर १२ ग्रॅम सोन्याची मागणी केली. मात्र हे पैसे त्यांनी दुकानात न घेता परिसरातील बिटको पॉईंट येथे घेतले व कुठल्याही प्रकारचे लेखी कागदपत्र दिले नाहीत. त्यांच्या या जाचाला कंटाळून माझ्या पुतण्याने आत्महत्या केली. त्यामुळे संबंधीतांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी दीपक दुसाने यांचे काका कालिदास दुसाने यांनी केली आहे.
या घटनेचे वृत्त समजात त्यांचे नातेवाईक, मित्र व सराफी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बिटको हॉस्पिटल येथे धाव घेतली. शवविच्छेदनानंतर आरोपींना शिक्षा झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास विरोध केला. उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निलेश माईनकर, नाशिक रोड पोलिस ठाण्यातील गुन्हे शाखेच्या योगेश पाटील घटनास्थळी धाव घेत उपस्थितांची समजुत काढत मृतदेह ताब्यात घेण्याची विनंती केली.

अजून बातम्या वाचा..

आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर ची जय भवानी व्यायामशाळेच्या वेटलिफ्टिंग खेळाडूना एक लाख एक्केचाळीस हजार रुपयांच साहित्य भेट

आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर ची जय भवानी व्यायामशाळेच्या वेटलिफ्टिंग खेळाडूना एक लाख एक्केचाळीस हजार रुपयांच साहित्य भेट

सलग तीन आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये पदक विजेता तसेच राष्ट्रीय वरीष्ठ गटातील विक्रम...

read more
श्रावण मास संकष्ट चतुर्थी निमित्त गुरुवार दिनांक 22/08/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

श्रावण मास संकष्ट चतुर्थी निमित्त गुरुवार दिनांक 22/08/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
दोन सुवर्ण पाच रौप्यपदकासह राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या खेळाडूंची चमकदार कामगिरी पूजा परदेशी आनंदी सांगळे ला सुवर्णपदक

दोन सुवर्ण पाच रौप्यपदकासह राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या खेळाडूंची चमकदार कामगिरी पूजा परदेशी आनंदी सांगळे ला सुवर्णपदक

बारामती येथे १६ ते १८ ऑगस्ट २०२४ दरम्यान संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय...

read more
विद्यार्थ्यांनी सामाजीक मूल्ये जपावीत – डॉ श्री.संजय शांताराम सांगळे,सिद्धी क्लासेस गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

विद्यार्थ्यांनी सामाजीक मूल्ये जपावीत – डॉ श्री.संजय शांताराम सांगळे,सिद्धी क्लासेस गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

मनमाड - शंभर टक्के निकालाची परंपरा असलेला सिद्धी क्लासेस कॅम्पसचा गुणगौरव सोहळा 2024, 15 ऑगस्ट...

read more
.