सलग तीन आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये पदक विजेता तसेच राष्ट्रीय वरीष्ठ गटातील विक्रम नावावर असलेला तसेच राष्ट्रीय युथ व खेलो इंडिया स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता मुकुंद संतोष आहेर याने मिळालेल्या रोख बक्षीसांच्या रकमेतून जय भवानी व्यायामशाळेतील खेळाडूना एक लाख एक्केचाळीस हजार रुपयांचे वेटलिफ्टिंग साहित्य भेट देवून खेळाडूंप्रती व व्यायामशाळेविषयी ऋण व्यक्त केले
मुकुंद च्या आई इंदूबाई वडील संतोष आहेर यांच्याहस्ते व्यायामशाळेत साहित्य पूजन करून आज ही अनोखी भेट खेळाडूना अर्पण केली
मुकुंद च्या लहान बहिणी मेघा व वीणाताई या दोघीसुद्धा राष्ट्रीय स्तरावरील पदक विजेत्या खेळाडू असून आहेर कुटुंबाकडून खेळाडूंसाठी वेटलिफ्टिंग चा चांगल्या दर्जाचा नवीन सेट खेळाडूना देण्यात आला
जय भवानी व्यायामशाळेतील सर्व खेळाडूंनी मुकुंद चे आभार मानत क्रीडा क्षेत्रात उत्तम कामगिरी करण्याची शपथ घेतली
याप्रसंगी प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे प्रदीप तायडे यांनी आहेर कुटुंबियांनी दिलेल्या भरघोस मदतीबद्दल त्यांचे आभार मानले