Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

राज्यात पुढील आठवड्यापासून धावणार दोन वंदे भारत एक्स्प्रेस

Feb 1, 2023

राज्यातून मुंबई – गांधीनगर आणि नागपूर बिलासपूर या दोन मार्गावर सध्या वंदे भारत एक्स्प्रेस धावत असून १० फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सीएसएमटी (मुंबई) -साईनगर शिर्डी आणि सोलापूर-सीएसएमटी दरम्यान धावणाऱ्या दोन वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखविणार आहेत.

या सेवेमुळे केवळ साडे सहा तासांत मुंबई ते सोलापूर हा प्रवास पूर्ण करता येणार आहे. सध्या सिद्धेश्वर एक्स्प्रेसला मुंबई ते सोलापूर अंतर कापण्यासाठी आठ तास लागतात. तसेच सीएसएमटी साईनगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेसमधून पाच तास ५५ मिनिटांत प्रवास पूर्ण होणार आहे.

या गाडीला १६ डबे, १,१२८ प्रवासी क्षमता असून देशभरात चालवण्यात येणाऱ्या वंदे भारतची बांधणी चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये करण्यात येत आहे. आहे.

जीपीएस आधारित ऑडिओ व्हिज्युअल प्रवासी माहिती प्रणालीने हे डबे सज्ज असणार आहेत. प्रत्येक ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ मध्ये १६ एसी डबे आहेत. तर एका गाडीची प्रवासी क्षमता एक हजार १२८ इतकी आहे. ह्या गाड्या सीएसएमटी-साई नगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस आठवड्यातील सहा दिवस धावणार (गुरुवार वगळता) असून ५ तास ५५ मिनिटांचा प्रवास होणार आहे.. सीएसएमटीतून सायंकाळी सव्वा सहा वाजता सुटून रात्री १२ वाजून १० मिनिटांनी पोहोचणार आहे. दादर, ठाणे, नाशिक रोडला थांबा आहे. याच प्रमाणे सोलापूर- सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस बुधवार वगळता आठवड्यातील सहा दिवस धावेल. (बुधवार वगळता). सोलापूर येथून सकाळी ६ वाजून ५ मिनिटांनी सुटून दुपारी १२.३५ वाजता सीएसएमटीला पोहोचणार आहे. दादर, ठाणे, लोणावळा, पुणे, कुर्डुवाडीला थांबणार आहे.

अजून बातम्या वाचा..

बांबूच्या काड्यांतून साकारला कष्टाचा आणि कौशल्याचा धडा – संस्कारखेळवाडीत कुटीरउद्योगाचे जिवंत प्रात्यक्षिक

बांबूच्या काड्यांतून साकारला कष्टाचा आणि कौशल्याचा धडा – संस्कारखेळवाडीत कुटीरउद्योगाचे जिवंत प्रात्यक्षिक

ग्रामीण जीवनातील स्वयंपूर्णतेची परंपरा आणि पारंपरिक कुटीरउद्योगाची ओळख बालकांना व्हावी, या...

read more
फ्रान्सच्या आकाशात मराठी शेतकऱ्याची भरारी; आंतरराष्ट्रीय फ्लाईंग फेस्टिव्हलमध्ये मंगेश दिघे यांची ऐतिहासिक कामगिरी

फ्रान्सच्या आकाशात मराठी शेतकऱ्याची भरारी; आंतरराष्ट्रीय फ्लाईंग फेस्टिव्हलमध्ये मंगेश दिघे यांची ऐतिहासिक कामगिरी

फ्रान्समधील ग्रेनोबलनजीक सेंट हिलारे येथे पार पडलेल्या ५३ व्या 'कुपेकार २०२६' या आंतरराष्ट्रीय...

read more
नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पास केंद्राची मंजुरी – नांदगाव तालुक्याच्या पदरी निराशाच

नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पास केंद्राची मंजुरी – नांदगाव तालुक्याच्या पदरी निराशाच

नाशिक आणि जळगाव या दोन जिल्ह्यांसाठी अत्यंत उपयुक्त अशा नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाला केंद्र...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]