loader image
[ays_poll id=7]

अर्थसंकल्प 2023: निर्मला सीतारामन यांनी केल्या या महत्त्वाच्या घोषणा…

Feb 1, 2023


1 फेब्रुवारी 2023 नवीन आर्थिक वर्षापासून 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर करातून सवलत मिळणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केंद्रीय अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात केली.

केंद्रीय अर्थमंत्र्यांनी करासंदर्भात नवीन संरचना जाहीर केली. नव्या करश्रेणीत 2.5 लाखांपासून स्लॅब सुरू झाले होते. आता स्लॅब्जची संख्या 5 पर्यंत करण्यात आली आहे. त्यानुसार

3 लाखांपर्यंत – कोणताही कर नाही

3 ते 6 लाख – 5 टक्के

6 ते 9 लाख – 10 टक्के

9 ते 12 लाख – 15 टक्के

12 ते 15 लाख – 20 टक्के

15 लाखांहून जास्त – 30 टक्के

अर्थसंकल्पातील सप्तर्षी
अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात कशावर भर देण्यात येईल ते सांगितलं. सात उद्दिष्टांना त्यांना सप्तर्षी असं संबोधलं.

-सर्वसमावेशक विकासपट

-शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणं

-पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक

-क्षमतांचा खऱ्या अर्थाने वापर करणे

-हरित विकास

-तरुणांचं सामर्थ्य

-आर्थिक क्षेत्र

अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे
केंद्रीय अर्थसंकल्प, निर्मला सीतारामण

शेती

-कृषी क्षेत्रासाठी डिजीटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर. अॅग्रीकल्चर अॅक्सिलरेटर फंड – शेती स्टार्टअपना प्रोत्साहन देण्यासाठी उभारण्यात येणार.

केंद्रीय अर्थसंकल्पात बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी भरड धान्य अर्थात मिलेट्सचं उत्पादन, विक्री आणि संशोधन यासाठी सरकार पुढाकार घेणार असल्याचं स्पष्ट केलं.

भरड धान्यांचा उल्लेख त्यांनी श्रीअन्न असा केला. हैदराबाद इथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिलेट्स स्थापन करणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी जाहीर केलं.

-157 नवीन नर्सिंग कॉलेज स्थापन करणार. सिकल सेल अॅनिमिया 2047 पर्यंत निर्मूलनाचं उद्दिष्टं

निवडक ICMR लॅब्समध्ये PPP ने संशोधन सुरू होणार. फार्मास्युटिकल्समध्ये संशोधनासाठी प्रकल्प.

शिक्षक प्रशिक्षणासाठी जिल्हा पातळीवर संस्थेचा विकास. लहान मुलं आणि किशोरवयीन मुलांसाठी नॅशनल डिजीटल लायब्ररी स्थापन होणार. नॅशनल बुक ट्रस्ट – चिल्ड्रन्स बुक ट्रस्ट प्रादेशिक भाषा आणि इंग्लिशमध्ये या लायब्ररींना शिक्षणेतर पुस्तकं देणार. आर्थिक साक्षरतेसाठी विविध वयोगटांनुसारची पुस्तकं या लायब्ररीला पुरवणार

ज्येष्ठ नागरिकांना बचत योजनांमध्ये सुविधा
2025-26 आधी वित्तीय तूट जीडीपीच्या 4.5 टक्क्यांच्या खाली आणण्याचा मानस

ज्येष्ठ नागरिकांना बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्याची कमाल मर्यादा 15 लाखांवरून 30 लाखांवर वाढवण्याची घोषणा

महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट उपलब्ध करून दिलं जाणार. दोन वर्षांसाठी हे प्रमाणपत्र मार्च 2025 पर्यंत उपलब्ध करून दिलं जाईल. 2 लाख रुपये एखादी महिला किंवा मुलीच्या नावे दोन वर्षांसाठी 7.5 टक्के व्याजदरावर गुंतवण्याची सुविधा उपलब्ध असेल. काही प्रमाणात ही रक्कम काढण्याचीही परवानगी असेल

पीएम आवास योजनेसाठीच्या तरतुदीत 66% टक्क्यांनी वाढून 79,000 कोटी एवढी असणार आहे. पायाभूत सुविधांमधली गुंतवणूक 33% वाढून 10 लाख कोटी होणार आहे. पायाभूत सुविधांमधली तरतूद जीडीपीच्या 3.3% टक्के असणार आहे.

रेल्वेसाठी 2.40 लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. आर्टिफिशयल इंटेलिजन्ससाठी तीन केंद्रांची स्थापना करण्यात येणार आहे.

पायाभूत सुविधांमधील भांडवली गुंतवणुकीत 33 टक्क्यांनी वाढ करून ती 10 लाख कोटींपर्यंत नेण्यात आली आहे. ही रक्कम एकूण जीडीपीच्या 3.3 टक्के आहे.

मत्स्य विकासासाठी 6 हजार कोटींची विशेष तरतूद

पॅनकार्डचा वापर सरकारी कार्यालयांमध्ये कॉमन आयडी अर्थात एकल ओळखपत्र म्हणून केला जाणार असल्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

बॅटरीवर चालणाऱ्या आणि इलेक्ट्रिक वस्तूंसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या आयातीवरील कस्टम ड्युटी कमी करण्याची घोषणा.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प 2023-24 जाहीर केल्यानंतर शेअर बाजारात सकारात्मक वातावरण पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स 980 अंकांनी वधारला आहे.

केतन डी देवरे
कर सल्लागार/आर्थिक विमा सल्लागार
सम्पर्क –
📞8793931292
🪀7276691876


अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ-वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या विलास गायकवाड च्या कुटुंबाला आमदार कांदे यांची मदत

बघा व्हिडिओ-वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या विलास गायकवाड च्या कुटुंबाला आमदार कांदे यांची मदत

गेल्या आठवड्यात नांदगाव तालुक्यातील खादगाव येथील विलास गायकवाड या घरातील कर्त्या पुरुषाचा वीज पडून...

read more
बघा व्हिडिओ-ना.छगन भुजबळ यांनी पाठविलेल्या समता परिषदेच्या शिष्टमंडळाने आंदोलक प्रा. हाके यांची घेतली वडीगोद्री येथे भेट

बघा व्हिडिओ-ना.छगन भुजबळ यांनी पाठविलेल्या समता परिषदेच्या शिष्टमंडळाने आंदोलक प्रा. हाके यांची घेतली वडीगोद्री येथे भेट

  नाशिक,दि.१८ जून :- ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी वडीगोद्री येथे प्रा.लक्ष्मण हाके व त्यांचे...

read more
वेहेळगाव आणि जळगाव बुद्रुक येथे शाळेच्या नूतन इमारतींचे आमदार कांदे यांच्या हस्ते उद्घाटन

वेहेळगाव आणि जळगाव बुद्रुक येथे शाळेच्या नूतन इमारतींचे आमदार कांदे यांच्या हस्ते उद्घाटन

शाळांची इमारत मंदिरच समजले पाहिजे, कारण या ठिकाणी कुठल्याही जातीपातीचा,धर्माचा विद्यार्थी...

read more
.