loader image
[ays_poll id=7]

दहावी बारावीच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर अर्धा तास अगोदर पोहचावे लागणार

Feb 2, 2023


­ महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून २१ फेब्रुवारी ते २५ मार्च २०२३ दरम्यान, दहावी व बारावी लेखी परीक्षा (SSC-HSC Exam) घेतल्या जाणार आहेत. परंतु, त्याआधी बोर्डाने विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.

 

या निर्णयानुसार उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर प्रवेश देण्यात येऊ नये असे आदेश केंद्रांना देण्यात आलेले आहेत. यापूर्वी एखाद्या परिस्थितीत दहा मिनिटे उशीर झाल्यानंतरदेखील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जात होता. परंतु, आता उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात येईल, असे आदेश बोर्डाने परीक्षा केंद्रांना दिले आहेत.

या निर्णयामुळे परीक्षा केंद्रांवर उशिरा पोहोचणाऱ्या विद्यार्थ्यांना पेपरला मुकावे लागू शकते. 21 फेब्रुवारी ते 25 मार्चदरम्यान घेण्यात येणारी दहावी-बारावीच्या परीक्षा सकाळच्या सत्रात 11 वाजता तर दुपारी 3 वाजता होणार आहे.परीक्षेसाठी आता विद्यार्थ्यांनी सकाळी साडे दहा तर दुपारी अडीच वाजता उपस्थित राहणे अनिवार्य असणार आहे. या संदर्भातील पत्रकदेखील मंडळाकडून सर्व शाळांना देण्यात आले आहेत.

उशीरा येण्याच्या सवलतीचा फायदा घेऊन लेखी परीक्षेला उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मोबाइलमध्ये प्रश्नपत्रिकेतील आशय असल्याचे लक्षात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे.


अजून बातम्या वाचा..

जय भवानी व्यायामशाळेच्या तीन खेळाडूंची राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड

जय भवानी व्यायामशाळेच्या तीन खेळाडूंची राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड

आज नाशिक येथे संपन्न झालेल्या नाशिक विभागीय (नाशिक जळगाव धुळे नंदुरबार)शालेय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत...

read more
राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी मनमाडच्या सहा खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड

राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी मनमाडच्या सहा खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड

मोदीनगर उत्तरप्रदेश येथे ४ ते १४ फेब्रुवारी २०२६ दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय यूथ जूनियर व सीनियर...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
.