loader image
[ays_poll id=7]

जे. टी. कासलीवाल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये क्रीडा महोत्सवास उत्साहात सुरुवात

Feb 2, 2023


नांदगाव सोमनाथ घोंगाणे

शहरातील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये क्रीडा महोत्सवास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान एम.जे. कासलीवाल एज्युकेशन संस्थेचे चेअरमन मा. सुनीलकुमारजी कासलीवाल यांनी भूषविले. कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत स्कूलचे प्राचार्य श्री. मनी चावला यांनी गुलाबपुष्प देऊन केले .कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन व दीप प्रज्वलनाने तसेच वर्ग 6वी व 3रीच्या विद्यार्थ्यांनी गायलेल्या प्रार्थना गीताने झाली. यानंतर शालेय क्रीडा शिक्षक बागुल सर यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी रेड, ग्रीन, ब्ल्यू, यलो या हाऊस प्रमाणे संचलन केले. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुंदर असे नृत्य सादर केले आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी लाल फीत कापून तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी शालेय ध्वज फडकवत श्रीफळ वाढवत, मशाल पेटवून केले. त्यानंतर संस्थेचे चेअरमन मा.सुनीलकुमारजी कासलीवाल यांनी सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा खेळाची शपथ दिली.
या कार्यक्रमांमध्ये विविध खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये कबड्डी खो-खो, रनिंग रेस, डॉजबॉल, लिंबू चमचा, पोते उडी याप्रमाणे अनेक खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विविध विद्यार्थी आपले कौशल्य दाखवीत मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत.
या कार्यक्रमासाठी मनमाड शहराचे प्रसिद्ध उद्योजक श्री. सुदेश अरोरा तसेच संस्थेचे सेक्रेटरी विजय चोपडा, जुगलकिशोर अग्रवाल, महेंद्रभाऊ चांदिवाल,सुशिलभाऊ कासलीवाल तसेच सौ.क मा. कासलीवाल माध्यमिक व प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री डफळ सर ,सावंत सर शिक्षक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थी, पालक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. शालिनी गोयल व सुदर्शन चोळके यांनी केले तर आभार शालेय क्रीडामंत्री अनुष्का सोनवणे यांनी मानले.


अजून बातम्या वाचा..

महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

  मनमाड :- महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड,...

read more
व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

मनमाड -- मनमाड शहर व्यापारी महासंघ चे अध्यक्ष राजाभाऊ पारीक तसेच त्यांचे लहान बंधू अनिल पारीक व...

read more
एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

  मनमाड:-एम.एस.स्पोर्ट्स,मनमाड आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रिडांगण,मनमाड...

read more
मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाड : मनमाड शहरातील डमरे कॉलनी परिसरातील व्यावसायिक मुर्तजा अब्दुल हुसेन रस्सीवाला यांच्या घरात...

read more
.