loader image
[ays_poll id=7]

येवल्याचे पंकज पारख यांना २२ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी अटक

Feb 3, 2023

येवल्यातील नामांकित उद्योजक आणि राजकारणी पंकज पारख यांची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने काही वर्षांपूर्वी नोंद घेतली होती. 4 किलो सोन्यापासून तयार करण्यात आलेला 1.30 कोटींचा शर्ट, पंकज पारख यांच्या शर्टाची गिनीज बुकमध्ये नोंद करण्यात आली होती. गोल्डमॅनला नाशिकच्या ग्रामीण पोलिसांच्या आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाने अटक केली आहे. पंकज पारख हे संचालक असलेल्या पतसंस्थेमध्ये 22 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप पंकज पारख यांच्यावर आहे. त्यामुळे नाशिक ग्रामीण पोलिसांनी पंकज पारख यांना अटक केली आहे.
येवला येथील कै.सुभाषचंद्र पारख पतसंस्थेच्या 17 संचालक मंडळावर 21 कोटी 16 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बँकेचे प्रशासक व सहाय्यक निबंधक प्रताप पाडवी यांनी तक्रार दिली होती. याप्रकरणात मुख्य आरोपी असलेले पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन पंकज पारख यांना नाशिक येथून अटक करण्यात आली आहे.

पंकज पारख हे सेनापती तात्या टोपे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष असून कै. सुभाषचंदजी पारख पतसंस्थेचे संस्थापक आहेत. पारख हे येवला नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्षही आहेत. काही वर्षांपूर्वी पंकज पारख यांच्या सोन्याच्या शर्टाने त्यांना गिनीज बुकमध्ये स्थान मिळवून दिले होते. पंकज पारख यांनी त्यांच्या वाढदिवशी सुमारे चार किलो वजनाचा सोन्याचा शर्ट घातला होता, ज्याची किंमत त्यावेळेस अंदाजे 98 लाख, 35 हजार 99 रुपये होती.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर मंडलाच्या वतीने स्वतंत्र हिंदुस्थान च्या 79 व्या स्वातंत्र्य दिना...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला....

read more
नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...

read more
फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
.