loader image
[ays_poll id=7]

सीरिया आणि तुर्कस्थान मध्ये भूकंपाने हाहाकार

Feb 6, 2023


सीरिया आणि तुर्कस्तान या देशांमध्ये आज पहाटे तीव्र भूकंप झाला. भूकंपमान यंत्रावर या भूकंपाची तीव्रता 7.8 रिश्टर स्केल इतकी नोंदली गेली आहे. भूकंपात आतापर्यंत 1900 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या अजूनही वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. भूकंपामुळे सर्वाधिक हानी ही दक्षीण तुर्कीमध्ये झाली. तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तैयप एर्दोगन यांनी ट्विटरवर सांगितले की, भूकंपाचा फटका बसलेल्या भागात शोध आणि बचाव पथके तात्काळ पाठवण्यात आली आहेत. 7.8 रिष्टर स्केलच्या भूकंपात तुर्कीमध्ये किमान 284 लोक ठार झाले आहेत आणि सुमारे 2,300 लोक जखमी झाले आहेत. मात्र हा आकडा आता सातत्याने वाढतो आहे. दरम्यान, 10 तुर्की शहरांमध्ये 1,700 हून अधिक इमारतींचे नुकसान झाल्याचेही या वृत्तात म्हटले आहे.

दरम्यान, तुर्कस्तानमध्ये झालेल्या भीषण भूकंपात अनेकांचा बळी गेल्यानंतर जगभरातून शोक व्यक्त करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून तुर्कस्तान आणि आजूबाजूच्या परिसरात झालेल्या भीषण भूकंपात झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला. शिवाय, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनीही ट्विट करून तुर्की आणि सीरिया या दोन्ही देशांना हादरवून सोडणाऱ्या भीषण भूकंपात झालेल्या जीवितहानीबद्दल दु:ख व्यक्त केले.


अजून बातम्या वाचा..

पहलगाम घटनेचा मनमाड क्रिकेट प्रीमियर लीग च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला

पहलगाम घटनेचा मनमाड क्रिकेट प्रीमियर लीग च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला

दिनांक २२/०४/२०२५ रोजी जम्मू काश्मीर राज्यातील पहलगाममधिल बैसरण येथे विदेश.देशभरातिल राज्यातून...

read more
.