loader image
[ays_poll id=7]

अंगणवाडी ७५ मध्ये माता रमाई जयंती साजरी

Feb 7, 2023


एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नागरी नाशिक -२.प्रकल्प अधिकारी आ.अजय फडोळ सर,मुख्यसेविका शितल गायकवाड मँडम याच्यां मार्गदर्शनाखाली कार्यरत अंगणवाडी क्र.७५.मनमाड विभाग येथे आज माता रमाई जयंती साजरी करण्यात आली. अंगणवाडी सेविका कल्पना जाधव आणि अलका गायकवाड मदतनिसताई तसेच विभागातील महिला पालक याच्यां हस्ते पुष्पहार अर्पण करुन त्याच्यां स्मृतीस त्रिवार अभिवादन करण्यात आले.
रमाई ह्याच्यां कार्याबद्दल कल्पना जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.
भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी, त्यागमुर्ती रमाबाई आंबेडकर ह्या होत्या. वंचितांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या बाबासाहेबांच्या पाठीशी त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या. बाबासाहेबांची प्रेरणा, स्फुर्ती आणि लढण्याची उर्मी रमाईंचा त्यागच होता. अशा या महान त्यागमुर्तीस विनम्र अभिवादन.
महापुरुषांचे व्यक्तिमत्त्व पर्वताच्या महान शिखराप्रमाणे असते. असे म्हटले जाते की, प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका महिलेचा हात असतो. मग ती आई किंवा पत्नी असु शकते. बाबासाहेबांना रमाईंची साथ नसती तर कदाचित भिवाचा भीमराव झाले नसते. स्त्री ही जशी गृहिणी तशी सुसंस्कारीत समाज निर्माण करणारी माताही असते . युगपुरुष महामानव डॉ. बाबासाहेबांच्या खडतर आयुष्यात, दारिद्र्यांच्या खोल दरीत असलेला संसाराचा गाडा ओढणारी, सहचारिणी पत्नी रमाई म्हणजे जणु चारित्र्याची मंगल प्रतिमाच होती.


अजून बातम्या वाचा..

कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे क्रांतीसुर्य म.ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे क्रांतीसुर्य म.ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

म. गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयाचे...

read more
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उत्कृष्ट चित्ररथांना भीमोत्सव तर्फे दिली जाणार रोख पारोषिक

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उत्कृष्ट चित्ररथांना भीमोत्सव तर्फे दिली जाणार रोख पारोषिक

मनमाड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भीमोत्सव आयोजन समितीच्या वतीने उत्कृष्ठ...

read more
नाशिक येथे होणाऱ्या शिवसेनेच्या निर्धार शिबिराच्या नियोजनासाठी गुरुवारी मनमाड येथे बैठक

नाशिक येथे होणाऱ्या शिवसेनेच्या निर्धार शिबिराच्या नियोजनासाठी गुरुवारी मनमाड येथे बैठक

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संघटनात्मक बांधणीकरीता नाशिक...

read more
.