loader image

माळी समाज बांधव रेल्वे कर्मचारी संघाच्या वतीने महात्मा फुले जयंती साजरी….

Apr 12, 2025


मनमाड : येथील माळी समाज बांधव रेल्वे कर्मचारी संघाच्या वतीने महात्मा ज्योतीराव फुले यांची जयंती विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरी करण्यात आली.

या निमित्ताने श्रीमती अलका शैलेश साळवे यांचे महात्मा फुले यांच्या जीवनावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते, त्यांनी महात्मा फुले यांच्या जीवनावरील विविध प्रसंगावर प्रकाशझोत टाकून उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.यावेळी या कार्यक्रमास रेल्वे विभागातील सर्व वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि विविध रेल्वे युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश खैरनार तर आभार प्रदर्शन आंबादास निकम यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संदीप सोनवणे, ज्ञानेश्वर म्हैसे,योगेश वाघ,महेंद्र शिंदे,अमोल शिंदे, सोनाली आहेर, चंद्रकांत खैरे, अक्षय जेजुरकर,उमेश खैरनार, संभाजी धनवटे, ईश्वर पाटील, स्नेहल सोनवणे,रवी सुरसे,मनोज गाजरे,विजय काळे,बाळू जाधव,योगेश बोढरे,पंकज मोकळ, आनंद खैरनार, गणेश वाघ आदी समाज बांधवांनी प्रयत्न केले.


अजून बातम्या वाचा..

भीमोत्सव समिती आयोजित प्रसिद्ध खंजिरी वादक मीरा उमप यांच्या गीतांची मैफल संपन्न

भीमोत्सव समिती आयोजित प्रसिद्ध खंजिरी वादक मीरा उमप यांच्या गीतांची मैफल संपन्न

मनमाड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीमोत्सव आयोजन समितीच्या वतीने आयोजित करण्यात...

read more
कवयित्री प्रतिभा खैरनार यांच्या ‘वंशावळीच्या प्राचीन सरीतून’ काव्यसंग्रहाचे पुण्यात प्रकाशन

कवयित्री प्रतिभा खैरनार यांच्या ‘वंशावळीच्या प्राचीन सरीतून’ काव्यसंग्रहाचे पुण्यात प्रकाशन

  नांदगाव: मारुती जगधने येथील प्रसिद्ध कवयित्री,कथा लेखिका यांच्या 'वंशावळीच्या प्राचीन...

read more
.