loader image
[ays_poll id=7]

अभ्यासाचे नियोजन करुन परीक्षेला सामोरे जा-प्रा.सुरेश नारायणे

Feb 9, 2023

नांदगाव सोमनाथ घोंगाणे

विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करुन पुढील शिक्षणाची दिशा ठरवावी. अभ्यासाचे नियोजन करुन परीक्षेला सामोरे गेल्यास यश नक्कीच मिळेल. त्यासाठी नियमित सराव ठेवा,पाठांतरावर भर देऊ नका,तो विषय समजून घ्या, मोबाईलचा अभ्यासात वापर कमी करुन क्रमिक पुस्तकांचा आधार घेऊन अभ्यासावर भर द्या, आणि भरपूर वाचन,चर्चा,टिपणे यावर भर देऊन अभ्यास केल्यास हमखास यशाचे शिखर गाठता येईल. असे प्रतिपादन प्रा. सुरेश नारायणे यांनी केले. ते भालूर येथील मविप्र संस्थेचे जनता कनिष्ठ महाविद्यालयात बारावी विद्यार्थ्यांना आशिर्वाद समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य महिरे एस.टी. होते. व्यासपीठावर प्रा. हिरे एस.के.प्रा.पाटोळे एस.बी.प्रा.श्रीमती जगताप जे.एस.प्रा.श्रीमती धोंड जे.पी. आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बारावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेसाठी पाहुण्यांच्या हस्ते सायकल स्टॅण्ड भेट म्हणून दिले. अश्विनी राठोड, विकास घोरपडे, श्रध्दा लहिरे, रुपाली पवार, मनिषा राठोड यांनी शाळेबद्दल व शिक्षकांबद्दल आदरभाव व्यक्त केला. प्रा. श्रीमती जे.एस.जगताप यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी अहंकार बाजूला सारुन समाजात सौजन्याने वागा,आई, वडील आणि गुरुजनांचा आदर राखा त्यांना विसरु नका अश्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य महिरे एस.टी. यांनी सांगितले. तसेच परीक्षेत संबंधी काही सूचना विद्यार्थ्यांना त्यांनी दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्ता चोळके व कविता मडके यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...

read more
फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
.