loader image

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना नांदगाव मराठी पत्रकार संघाने दिले निवेदन

Feb 10, 2023


केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री, डॉक्टर भारती पवार यांना नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने निवेदन देण्यात आले.

मनमाड येथील पत्रकार कार्यालयात खासदार भारती पवार आले असता हे निवेदन देण्यात आले.मनमाड शहरात पत्रकार कॉलनी व पत्रकार भवन बांधण्यात यावे असे आशयाचे निवेदन पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष अमोल खरे,जेष्ठ पत्रकार आप्पा परदेशी,नरेश गुजराथी,सतीश शेखदार,अनिल निरभवणे,नरहरी उंबरे,निलेश वाघ,उपाली परदेशी,नाना आहिरे,अफरोज अत्तार,अनिस शेख, आदी पदाधिकारी,पत्रकार बांधव उपस्थित होते.

नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघ ही मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न संस्था आहे. धर्मदाय आयुक्त, नासिक यांच्याकडे नोंदणी झालेली अधिकृत आणि मान्यताप्राप्त संस्था-संघटना आहे. मनमाड शहरातील व नांदगाव तालुक्यातील पत्रकारांसाठी मनमाड येथे पत्रकार कॉलनी व पत्रकार भवन उभारण्यात यावी असे आप्पा परदेशी,नरेश गुजराथी व अमोल खरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.


अजून बातम्या वाचा..

भीमोत्सव समिती आयोजित प्रसिद्ध खंजिरी वादक मीरा उमप यांच्या गीतांची मैफल संपन्न

भीमोत्सव समिती आयोजित प्रसिद्ध खंजिरी वादक मीरा उमप यांच्या गीतांची मैफल संपन्न

मनमाड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीमोत्सव आयोजन समितीच्या वतीने आयोजित करण्यात...

read more
कवयित्री प्रतिभा खैरनार यांच्या ‘वंशावळीच्या प्राचीन सरीतून’ काव्यसंग्रहाचे पुण्यात प्रकाशन

कवयित्री प्रतिभा खैरनार यांच्या ‘वंशावळीच्या प्राचीन सरीतून’ काव्यसंग्रहाचे पुण्यात प्रकाशन

  नांदगाव: मारुती जगधने येथील प्रसिद्ध कवयित्री,कथा लेखिका यांच्या 'वंशावळीच्या प्राचीन...

read more
.