Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

श्री नीलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट ला महाराष्ट्र शासन च्या सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा 2026 मध्ये जिल्हा स्तरीय पुरस्कार जाहीर

Nov 5, 2026

श्री नीलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट ला महाराष्ट्र शासन च्या सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा 2026 मध्ये जिल्हा स्तरीय पुरस्कार जाहीर मनमाड – शहराचे धार्मिक व सांस्कृतिक वैभव असणाऱ्या व 1997 पासून आम्ही परंपरा पाळतो..!आम्ही संस्कृती चे रक्षण करतो..!हे ब्रीद वाक्य घेऊन सलग 30 वर्ष लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असणारा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या श्री नीलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट ला यंदा महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालया तर्फे गणेशोत्सव “राज्य महोत्सव “या अंतर्गत महाराष्ट्र शासन व पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी मुंबई संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा स्तरीय सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा 2026 मध्ये पुरस्कार मिळण्याची परंपरा कायम ठेवत नाशिक जिल्हा स्तर वर तृतीय पुरस्कार जाहीर झाला आहे रोख रक्कम रुपये 30000/- व गौरव पत्र असं या पुरस्कार चे स्वरूप आहे या आधी पण सन 2016 सन 2017 सन 2018 सन 2019 मध्ये महाराष्ट्र शासन व पोलीस विभाग तर्फे ट्रस्टला पुरस्कार मिळाले आहेत हा पाचवा पुरस्कार आहे सलग 30 वर्ष डीजे गुलाल,नाचणे या गोष्टी ना फाटा देत पारंपरिक धार्मिक पद्धतीने स्थापना व विसर्जन मिरवणूक सकाळी काढण्याचा विक्रम श्री नीलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट ने केला आहे गेल्या 30 वर्षात सामाजिक बांधिलकी जपत ट्रस्ट द्वारे अनेक सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, आरोग्य, पर्यावरण, शैक्षणिक कला, क्रीडा क्षेत्रात विविध नावीन्य पूर्ण व समाज उपयोगी उपक्रम सातत्याने राबविणात आले आहेत श्री नीलमणी ट्रस्ट ने यंदाच्या सार्वजनिक विसर्जन मिरवणुकीत व्यसन मुक्तीचा जनजागृती संदेश देणारा उपक्रम सादर केला होता तर गेल्या 10 वर्षात शिल्लक औषधं संकलन करून केंद्र द्वारे ट्रस्ट ने रुपये 05 लाखा जास्त किमती ची औषधं गरजू गरीब रुग्ण ना मोफत दिली तर भविष्यात ही ट्रस्ट तर्फे सर्व गणेश भक्तांच्या विशेष सहकार्या ने लोककल्याणा चे विविध उपक्रम राबविण्यात येतील असा मनोदय श्री नीलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट चे अध्यक्ष किशोर गुजराथी, सचिव नितीन पांडे, उपाध्यक्ष शेखर पांगूळ, विश्वस्त गोविंद रसाळ, प्रज्ञेश खांदाट, नारायण फुलवाणी, भिकाजी कुलकर्णी यांनी व्यक्त केला तर नीलमणी मंडळा चे अक्षय सानप, अभिषेक पितृभक्त, भरत छाबडा, राहुल लांबोळे, आकाश वाघ, मछिंद्र साळी,अक्षत झाल्टे संदीप शिनकर,दीपक शिंदे, नीलकंठ त्रिभुवन आदी नी ही सतत ट्रस्ट च्या सर्व उपक्रमा विशेष सहयोग दिला या जिल्हा स्तरीय पुरस्कार मुळे श्री नीलमणी ट्रस्ट चे सर्व नाशिक जिल्हा तुन सर्व स्तर वर अभिनंदन होतं आहे.

अजून बातम्या वाचा..

अमरावती विभागात  आ. सुहास कांदे यांच्या नियोजनबद्ध रणनीतीमुळे किरण सरनाईक यांचा दणदणीत विजय

अमरावती विभागात आ. सुहास कांदे यांच्या नियोजनबद्ध रणनीतीमुळे किरण सरनाईक यांचा दणदणीत विजय

अमरावती विभागात आ. सुहास कांदे यांच्या नियोजनबद्ध रणनीतीमुळे किरण सरनाईक यांचा दणदणीत विजय अमरावती...

read more
आकांक्षा व्यवहारेचे सुवर्णपदक, मेघा आहेरला कांस्यपदक; श्रावणी पुरंदरेचा चौथा क्रमांक

आकांक्षा व्यवहारेचे सुवर्णपदक, मेघा आहेरला कांस्यपदक; श्रावणी पुरंदरेचा चौथा क्रमांक

आकांक्षा व्यवहारेचे सुवर्णपदक, मेघा आहेरला कांस्यपदक; श्रावणी पुरंदरेचा चौथा क्रमांक पश्चिम...

read more
पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी आकांक्षा व्यवहारे, मेघा आहेर व श्रावणी पुरंदरे यांची निवड

पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी आकांक्षा व्यवहारे, मेघा आहेर व श्रावणी पुरंदरे यांची निवड

      पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी आकांक्षा व्यवहारे, मेघा आहेर व...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]