मेष :- गैरसमजुतीतून वाद निर्माण होवू शकतो. चुकीच्या व्यक्तींमुळे मन:स्ताप होण्याची शक्यता आहे.
वृषभ :- आपली बुद्धिमत्ता दाखवण्याची संधी मिळेल. फार कर्मठपणे वागू नये.
मिथुन :- काही गुणांना उशिरा वाव मिळेल. मनातील आशा-निराशा बोलून दाखवाव्या.
कर्क :- स्वत:बद्दल नसत्या कल्पना बाळगाल. परिस्थिती अनुरूप वागणे ठेवाल.
सिंह :- शांत व खोलवर विचार करावा. काही गोष्टींचे मनन करावे लागेल. चुकीचे निर्णय प्रयत्नाने सुधारावेत.
कन्या :- मानसिक स्थैर्य जपावे. चटकन निराश होणे टाळावे. परिस्थितीतून मार्ग काढावा.
तूळ :- कामाची दगदग जाणवेल. थोडा वेळ आपल्यासाठी देखील काढावा लागेल. आर्थिक व्यवहार विचारपूर्वक कराल.
वृश्चिक :- मनातील संशय दूर सारावा. चिकाटीने कामे कराल. नवीन गोष्टींचे ज्ञान मिळवण्याची इच्छा बाळगाल.
धनू :- चांगला आर्थिक लाभ होईल. चिकाटीने कामे करून उणीव भरून काढाल. स्वकष्टावर अधिक लक्ष द्याल.
मकर :- आधुनिक विचार आमलात आणून पहावेत. कामे संथगतीने पार पडतील. अंगीभूत कलेचे कौतुक केले जाईल.
कुंभ :- प्रतिकूलतेतून मार्ग काढावा. पारंपरिक कामात यश मिळेल. मनातील चुकीचे विचार बाजूला सारावेत.
मीन :- तुमचे कार्यक्षेत्र वाढवावे लागेल. कर्तबगारीला चांगला वाव मिळेल.












