loader image

बघा व्हिडिओ – नांदेश्वर महादेव मंदिरात व्हि जे हायस्कूलच्या १o८ विद्यार्थ्यानी केले शिव तांडव स्तोत्राचे पठण

Feb 17, 2023


नांदगाव सोमनाथ घोंगाणे
नांदगाव शहरातील व्ही . जे . हायस्कूलच्या १०८ विद्यार्थ्यानी केले शिव तांडव स्तोत्राचे सामुहिक पठण केले. शहरातील नामांकीत नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या व्ही . जे . हायस्कूलच्या विद्यार्थ्यानी शहरातील प्राचीन नांदेश्वर महादेव मंदिर परिसरात महाशिवरात्रीच्या पुर्व संध्येला शिव तांडव स्तोत्राचे सामुहिक पठण केले . यावेळी १०८ विद्यार्थ्यांनी तालासुरात सामुहिक स्तोत्र पठणाचा उपक्रम घेतला. महाशिवरात्रीच्या पूर्व संध्येचे औचित्य साधून या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.मृण्मयी दंडगव्हाळ व समिक्षा देसले या विद्यार्थिनींनी कथ्थक नृत्याव्दारा तांडव नृत्य सादर केले.सर्व विद्यार्थ्यांना कलाशिक्षक चंद्रकांत दाभाडे व अविनाश सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे संकुल प्रमुख संजीव धामणे, मुख्याध्यापक मनोहर बडगुजर, उपमुख्याध्यापक दिपक बाकळे, पर्यवेक्षक मनोहर शिंदे यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्याचे कौतुक केले.

 

 

 

 


अजून बातम्या वाचा..

भर बाजारपेठेत झालेल्या चोरी बाबत व्यापारी महासंघातर्फे पोलीस स्टेशनला निवेदन

भर बाजारपेठेत झालेल्या चोरी बाबत व्यापारी महासंघातर्फे पोलीस स्टेशनला निवेदन

मनमाड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या एकात्मता चौक येथील दुकानांमध्ये 21 फेब्रुवारीच्या रात्री...

read more
छत्रपती शिवाजी महाराज स्मारक लोकार्पण सोहळा – १८ फेब्रुवारीला मनमाड मध्ये भरगच्च कार्यक्रम

छत्रपती शिवाजी महाराज स्मारक लोकार्पण सोहळा – १८ फेब्रुवारीला मनमाड मध्ये भरगच्च कार्यक्रम

मनमाड - अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा...

read more
.