loader image
[ays_poll id=7]

जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी. नांदगाव सोमनाथ घोंगाणे

Feb 17, 2023


शहरातील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये शिवजंयती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली
दि.१७ फेब्रुवारी रोजी नांदगाव शहरातील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला प्राचार्य मणी चावला यांनी पुष्पहार अर्पण करूण कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शाळेतील मुलांनी विविध पात्रांची वेशभूषा करीत शिवाजी महाराजांच्या जीवनावर एकांकिका सादर केल्या. तसेच विद्यार्थ्यांनसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भाषणे, नृत्य, गायन, पोवाडे अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांनी शाळेचे आवार दणाणून गेले होते. यावेळी विद्यार्थ्यांचा उत्साह अवर्णनीय होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शालिनी गोयल यांनी तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक रूपाली खरोटे यांनी केले.तर आभार सविता शिंदे यांनी मानले.सर्व विद्यार्थ्यांना
संस्थेचे चेअरमन मा. श्री. सुनिलकुमारजी कासलीवाल तसेच संस्थेचे सचिव विजय चोपडा, सरचिटणीस प्रमिलाताई कासलीवाल, जुगलकिशोर अग्रवाल, रिखबचंद कासलीवाल, महेंद्र चांदिवाल, प्रशासकीय प्रमुख प्रकाश गुप्ता, स्कूलचे प्राचार्य मनी चावला, शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी शिवजयंती निमित्ताने शुभेच्छा दिल्या.

 


अजून बातम्या वाचा..

नांदगाव शहरातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नारधमावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

नांदगाव शहरातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नारधमावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

नांदगाव : प्रतिनिधी येथील अल्पवयीन पीडित मुलीवर अत्याचार करुन तिच्याशी गैर वर्तन करणाऱ्या नराधमास...

read more
उज्जैन येथील प्रसिध्द महाकाल मंदिरात भस्म आरती दरम्यान आग – सुदैवाने जीवितहानी नाही

उज्जैन येथील प्रसिध्द महाकाल मंदिरात भस्म आरती दरम्यान आग – सुदैवाने जीवितहानी नाही

मध्य प्रदेशातील उज्जैन येथील प्रसिद्ध असलेल्या महाकाल मंदिराच्या गर्भगृहात आज सोमवारी भस्म...

read more
नांदगाव सह येवला, मालेगावात उष्माघाताच्या लाटेची शक्यता; 112 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात कक्ष

नांदगाव सह येवला, मालेगावात उष्माघाताच्या लाटेची शक्यता; 112 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात कक्ष

मनमाड - मार्च महिन्यातच जिल्ह्यात तापमान ३३ ते ३५ अंशांवर पोचल्याने उष्णतेची लाट जाणवू लागली आहे....

read more
ओम मित्र मंडळ संचालित श्रीराम जन्मोत्सव समिती मनमाड 2024 – जाहीर बैठक                             

ओम मित्र मंडळ संचालित श्रीराम जन्मोत्सव समिती मनमाड 2024 – जाहीर बैठक                             

मनमाड - सालाबादप्रमाणे  1986 पासून सलग 38 व्या वर्षी यंदाही श्रीराम मंदिर आठवडे बाजार मनमाड येथे...

read more
.