loader image
[ays_poll id=7]

भूमी क्रिकेट संघाचा चाळीसगाव क्रिकेट संघावर विजय – रुषी शर्मा सामनावीर

Feb 18, 2023

शनिवार दि. १८ फेब्रुवारी २०२३ रोजी भूमी क्रिकेट अकॅडमी मनमाड विरुध्द चाळीसगाव क्रिकेट अकॅडमी या संघामध्ये झालेल्या सामन्यात भूमी क्रिकेट अकॅडमी संघाने आठ बळी राखुन विजय प्राप्त केला. ४० षटकांच्या या सामन्यामध्ये चाळीसगाव संघाने नाणेफेक जिंकुन फलंदाजी करण्याचे ठरवले. चाळीसगाव संघाने प्रथम फलंदाजी करताना १८ षटकात १० बळी गमवुन फक्त १०२ धावा केल्या. ज्यात मनमाड संघातील रुषी शर्मा या गोलंदाजाने ५ बळी मिळविले. अभिजीतने ३ तर चिराग निफाडकर व ओम फासळे यांनी प्रत्येकी एक बळी मिळविला. या धावांचा पाठलाग करत असताना मनमाड संघाने ८.५ षटकातच २ बळी गमवुन ह्या सामण्यात एक सहज विजय प्राप्त केला. मनमाड संघाच्या फलंदाजीत रोहित पवार नाबाद 38 धावा व हसन शेख यानी ही नाबाद 34 धावा फटकाविल्या. ५ षटकात गोलंदाजीत 12 धावा देऊन ५ बळी टिपणारा रुषी शर्मा सर्वोत्कृष्ठ गोलंदाज या सामण्याचा सामनावीर ठरला.

भूमी क्रिकेट अकॅडमी, मनमाड चे संचालक व कोच सिध्दार्थ ( भोला ) रोकडे व वाल्मिक रोकडे यांनी या सामण्याचे आयोजन महर्षी भगवान वाल्मिकी स्टेडियम मनमाड येथे केले.

अकॅडमीचे चे मार्गदर्शक श्री. ईरफान मोमीन , राजाभाऊ पगारे , गणेश धात्रक , हबीब शेख , सिद्धार्थ बरडीया , परवेज शेख , कौशल शर्मा , तय्यब शेख , शुभम ( बापु ) गायकवाड , शुभम बिडगर रोहित पवार यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. भुमी क्रिकेट अकॅडमीचे आधारस्तंभ ईरफान भाई मोमीन यांनी खेळाडुंना पुढिल सामण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

अजून बातम्या वाचा..

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये एल.आय.सी.मार्फत शाळेतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम संपन्न.

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये एल.आय.सी.मार्फत शाळेतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम संपन्न.

  मनमाड :- भारतीय जीवन विमा निगम,मनमाड कार्यालय मार्फत एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनियर...

read more
बघा व्हिडिओ-घाटमाथ्यावरील नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आमदार कांदे यांचे आदेश

बघा व्हिडिओ-घाटमाथ्यावरील नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आमदार कांदे यांचे आदेश

आमदार सुहास अण्णा कांदे यांनी आज नांदगाव विधानसभा मतदारसंघातील बोलठाण घाट माथ्यावरील अतिृष्टीमुळे...

read more
येत्या वर्षापासून लागु होणार नवीन शैक्षणिक धोरण – शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर

येत्या वर्षापासून लागु होणार नवीन शैक्षणिक धोरण – शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर

येत्या वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरण लागू होणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर...

read more
अयोध्या दौऱ्यावरून परतताच मुख्यमंत्री नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर – नुकसान भरपाईची घोषणा होणार ?

अयोध्या दौऱ्यावरून परतताच मुख्यमंत्री नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर – नुकसान भरपाईची घोषणा होणार ?

नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. मागील महिनाभरात तिसऱ्यांदा...

read more
मनमाड महाविद्यालयात लिंगभाव समानता: वित्तीय सक्षमीकरण व तंत्रज्ञान या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

मनमाड महाविद्यालयात लिंगभाव समानता: वित्तीय सक्षमीकरण व तंत्रज्ञान या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयातील...

read more
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शांततेत आणि उत्साहात साजरी करावी – पोलीस अधिक्षक अनिकेत भारती

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शांततेत आणि उत्साहात साजरी करावी – पोलीस अधिक्षक अनिकेत भारती

मनमाड - मनमाड शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्याची आगळी परंपरा...

read more
.