loader image
[ays_poll id=7]

भूमी क्रिकेट संघाचा चाळीसगाव क्रिकेट संघावर विजय – रुषी शर्मा सामनावीर

Feb 18, 2023

शनिवार दि. १८ फेब्रुवारी २०२३ रोजी भूमी क्रिकेट अकॅडमी मनमाड विरुध्द चाळीसगाव क्रिकेट अकॅडमी या संघामध्ये झालेल्या सामन्यात भूमी क्रिकेट अकॅडमी संघाने आठ बळी राखुन विजय प्राप्त केला. ४० षटकांच्या या सामन्यामध्ये चाळीसगाव संघाने नाणेफेक जिंकुन फलंदाजी करण्याचे ठरवले. चाळीसगाव संघाने प्रथम फलंदाजी करताना १८ षटकात १० बळी गमवुन फक्त १०२ धावा केल्या. ज्यात मनमाड संघातील रुषी शर्मा या गोलंदाजाने ५ बळी मिळविले. अभिजीतने ३ तर चिराग निफाडकर व ओम फासळे यांनी प्रत्येकी एक बळी मिळविला. या धावांचा पाठलाग करत असताना मनमाड संघाने ८.५ षटकातच २ बळी गमवुन ह्या सामण्यात एक सहज विजय प्राप्त केला. मनमाड संघाच्या फलंदाजीत रोहित पवार नाबाद 38 धावा व हसन शेख यानी ही नाबाद 34 धावा फटकाविल्या. ५ षटकात गोलंदाजीत 12 धावा देऊन ५ बळी टिपणारा रुषी शर्मा सर्वोत्कृष्ठ गोलंदाज या सामण्याचा सामनावीर ठरला.

भूमी क्रिकेट अकॅडमी, मनमाड चे संचालक व कोच सिध्दार्थ ( भोला ) रोकडे व वाल्मिक रोकडे यांनी या सामण्याचे आयोजन महर्षी भगवान वाल्मिकी स्टेडियम मनमाड येथे केले.

अकॅडमीचे चे मार्गदर्शक श्री. ईरफान मोमीन , राजाभाऊ पगारे , गणेश धात्रक , हबीब शेख , सिद्धार्थ बरडीया , परवेज शेख , कौशल शर्मा , तय्यब शेख , शुभम ( बापु ) गायकवाड , शुभम बिडगर रोहित पवार यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. भुमी क्रिकेट अकॅडमीचे आधारस्तंभ ईरफान भाई मोमीन यांनी खेळाडुंना पुढिल सामण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

अजून बातम्या वाचा..

रा से यो हे समाज जाणून घेण्याचे माध्यम – इंजि. अमित बोरसे पाटील मवीप्र मनमाड महाविद्यालय रासेयो “विशेष श्रमसंस्कार ” शिबिराचा समारोप

रा से यो हे समाज जाणून घेण्याचे माध्यम – इंजि. अमित बोरसे पाटील मवीप्र मनमाड महाविद्यालय रासेयो “विशेष श्रमसंस्कार ” शिबिराचा समारोप

मराठा विद्या प्रसारक समाजाचे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय मनमाड व सावित्रीबाई फुले पुणे...

read more
आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेला दिमाखात सुरुवात… एच.ए.के.हायस्कूल व गुड शेफर्ड हायस्कूल क्रिकेट संघ उपांत्यफेरीत दाखल

आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेला दिमाखात सुरुवात… एच.ए.के.हायस्कूल व गुड शेफर्ड हायस्कूल क्रिकेट संघ उपांत्यफेरीत दाखल

मनमाड:- मनमाड क्रिकेट समिती आयोजित महर्षी वाल्मिकी क्रीडा संकुल,मनमाड येथे माध्यमिकस्तरीय...

read more
महसूल प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात विरोधात महाराष्ट्र राज्याचे लोकायुक्त यांचेकडे तक्रार दाखल

महसूल प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात विरोधात महाराष्ट्र राज्याचे लोकायुक्त यांचेकडे तक्रार दाखल

नांदगाव सोमनाथ घोंगाणे नांदगाव तालुक्यातील जळगाव खुर्द सह शेजारील गावांच्या शिवारात ऑक्टोबर २०१९...

read more
मनमाड रेल्वे स्थानकात जनशताब्दी एक्सप्रेसच्या इंजिनचे कपलींग तुटल्याने अर्धी गाडी पुढे तर अर्धी गाडी मागे राहिल्याचा प्रका

मनमाड रेल्वे स्थानकात जनशताब्दी एक्सप्रेसच्या इंजिनचे कपलींग तुटल्याने अर्धी गाडी पुढे तर अर्धी गाडी मागे राहिल्याचा प्रका

मनमाड :- जालना मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस या गाडीच्या आरक्षित बोगी ची कपलिंग तुटल्याची घटना...

read more
टाटांच्या वाढदिवसानिमित्त सध्या सोशल मीडियावर फॉरवर्ड होणाऱ्या मेसेज ची ही आहे सत्यता

टाटांच्या वाढदिवसानिमित्त सध्या सोशल मीडियावर फॉरवर्ड होणाऱ्या मेसेज ची ही आहे सत्यता

सोशल मीडीयामध्ये अनेक उलट सुलट बातम्या त्यामधील सत्यता न पडताळता झपाट्याने शेअर होत असतात. सध्या...

read more
.