loader image
[ays_poll id=7]

भूमी क्रिकेट संघाचा चाळीसगाव क्रिकेट संघावर विजय – रुषी शर्मा सामनावीर

Feb 18, 2023


शनिवार दि. १८ फेब्रुवारी २०२३ रोजी भूमी क्रिकेट अकॅडमी मनमाड विरुध्द चाळीसगाव क्रिकेट अकॅडमी या संघामध्ये झालेल्या सामन्यात भूमी क्रिकेट अकॅडमी संघाने आठ बळी राखुन विजय प्राप्त केला. ४० षटकांच्या या सामन्यामध्ये चाळीसगाव संघाने नाणेफेक जिंकुन फलंदाजी करण्याचे ठरवले. चाळीसगाव संघाने प्रथम फलंदाजी करताना १८ षटकात १० बळी गमवुन फक्त १०२ धावा केल्या. ज्यात मनमाड संघातील रुषी शर्मा या गोलंदाजाने ५ बळी मिळविले. अभिजीतने ३ तर चिराग निफाडकर व ओम फासळे यांनी प्रत्येकी एक बळी मिळविला. या धावांचा पाठलाग करत असताना मनमाड संघाने ८.५ षटकातच २ बळी गमवुन ह्या सामण्यात एक सहज विजय प्राप्त केला. मनमाड संघाच्या फलंदाजीत रोहित पवार नाबाद 38 धावा व हसन शेख यानी ही नाबाद 34 धावा फटकाविल्या. ५ षटकात गोलंदाजीत 12 धावा देऊन ५ बळी टिपणारा रुषी शर्मा सर्वोत्कृष्ठ गोलंदाज या सामण्याचा सामनावीर ठरला.

भूमी क्रिकेट अकॅडमी, मनमाड चे संचालक व कोच सिध्दार्थ ( भोला ) रोकडे व वाल्मिक रोकडे यांनी या सामण्याचे आयोजन महर्षी भगवान वाल्मिकी स्टेडियम मनमाड येथे केले.

अकॅडमीचे चे मार्गदर्शक श्री. ईरफान मोमीन , राजाभाऊ पगारे , गणेश धात्रक , हबीब शेख , सिद्धार्थ बरडीया , परवेज शेख , कौशल शर्मा , तय्यब शेख , शुभम ( बापु ) गायकवाड , शुभम बिडगर रोहित पवार यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. भुमी क्रिकेट अकॅडमीचे आधारस्तंभ ईरफान भाई मोमीन यांनी खेळाडुंना पुढिल सामण्यासाठी शुभेच्छा दिल्या.


अजून बातम्या वाचा..

लोकसभेच्या मा.सभापती सुमित्राजी महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत इंडियन हायस्कुलचा शताब्दी महोत्सव सोहळा संपन्न…

लोकसभेच्या मा.सभापती सुमित्राजी महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत इंडियन हायस्कुलचा शताब्दी महोत्सव सोहळा संपन्न…

मनमाड 🙁 योगेश म्हस्के ) येथील राष्ट्रीय शिक्षण संस्था संचलित मध्य रेल्वे माध्यमिक विद्यालय...

read more
बघा व्हिडिओ – इंडियन स्कूल मनमाडच्या शताब्दी महोत्सवास उपस्थित राहत आमदार कांदे यांनी दिल्या शुभेच्छा

बघा व्हिडिओ – इंडियन स्कूल मनमाडच्या शताब्दी महोत्सवास उपस्थित राहत आमदार कांदे यांनी दिल्या शुभेच्छा

मध्य रेल्वे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, इंडियन हायस्कूल मनमाड च्या शताब्दी महोत्सव व माजी...

read more
मनमाड एफसीआय मधुन तत्काळ धान्य पुरवठा करा ! केंद्रीय मंत्री भारती पवार यांचे अधिकार्याना सुचना

मनमाड एफसीआय मधुन तत्काळ धान्य पुरवठा करा ! केंद्रीय मंत्री भारती पवार यांचे अधिकार्याना सुचना

नाशिक- देशातील शेवटच्या घटका पर्यंत गोरगरीब जनतेला धान्य मिळावे यासाठी केंद्रीय यंत्रणा काम करीत...

read more
.