नाशिक- देशातील शेवटच्या घटका पर्यंत गोरगरीब जनतेला धान्य मिळावे यासाठी केंद्रीय यंत्रणा काम करीत आहे मात्र नाशिक जिल्हा सार्वजनिक वितरण व्यवस्था आणि भारतीय अन्न महामंडळ यांच्यात सुसुत्रता नसल्याने धान्य वितरणास विलंब होत आहे, किंबहुना लाभार्थ्यांना रेशनिंग धान्य पासुन वंचित राहवे लागत आहे, संबंधित विभागाने तातडीने धान्य वितरणाचे सुक्ष्म नियोजन करावे आणि या योजनेचा लाभ गरीब कुटुंबांना मिळावा अशी सक्त सूचना केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारतीताई पवार यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
भारतीय अन्न महामंडळ चे राज्य सल्लागार सदस्य सिध्देश्वर बापु शिंदे, यांनी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारतीताई पवार यांची भेट घेऊन भारतीय अन्न महामंडळ आणि सार्वजनिक वितरण व्यवस्था नाशिक यांचा ढिसाळ कारभारामुळे गरीब वंचित आदिवासी लाभार्थ्यां पर्यंत सुरळीत धान्य पुरवठा होत नसल्याचे निदर्शनास आणुन दिले.
भारतीय अन्न महामंडळा कडुन धान्य पुरवठा वेळेवर होत नसल्या कारणाने नाशिक जिल्ह्यातील बहुतेक ठिकाणी महिना अखेर पर्यंत धान्य पोहचत नाही , नाशिक जिल्ह्याला साधारण ४१ हजार मेट्रिक टन धान्य लागते. त्यापैकी २१हजार मेट्रिक टन धान्य हे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनांतर्गत ( PMGKY) आहे,
तर २० हजार मेट्रिक टन धान्य हे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतंर्गत आहे , परंतु केंद्रीय व्यवस्था आणि नाशिक जिल्हा धान्य वितरण व्यवस्था यांच्यात सुसुत्रता नसल्याने त्याचा फटका हा लाभार्थ्यांना बसत असल्याचे समितीचे सदस्य यांनी मंत्रीमहोदय यांच्या निदर्शनास आणुन दिले ,
यावेळी मंत्री भारती पवार यांनी पुरवठा विभागा कडुन धान्य वितरण व्यवस्थेचा संपूर्ण आढावा घेतला असुन धान्य पुरवठा आणि वितरण या दोन्ही यंत्रणेत सुसुत्रता आणुन लवकरात लवकर दोन्ही विभागाने सुक्ष्म नियोजन करण्याचे आदेश दिले.
तसेच केंद्रीय भंडार निगम (CWC ) मध्ये गेली ३० वर्षांपासून काम करणाऱ्या माथडी कामगारांची टोळी नंबर २२ मधील साठ कामगारांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
या विषयी केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांची लवकरच भेट घेणार असल्याचे मंत्री भारतीताई पवार यांनी सांगितले
श्रीराम जन्मोत्सव निमित्त मनमाडला बुधवारी बैठकीचे आयोजन
मनमाड- सालाबादप्रमाणे 1986 पासून सलग 40 व्या वर्षी यंदाही श्रीराम मंदिर आठवडे बाजार मनमाड येथे...











