loader image
[ays_poll id=7]

भूमी क्रिकेट संघाचा चाळीसगाव क्रिकेट संघावर विजय – रुषी शर्मा सामनावीर

Feb 18, 2023

शनिवार दि. १८ फेब्रुवारी २०२३ रोजी भूमी क्रिकेट अकॅडमी मनमाड विरुध्द चाळीसगाव क्रिकेट अकॅडमी या संघामध्ये झालेल्या सामन्यात भूमी क्रिकेट अकॅडमी संघाने आठ बळी राखुन विजय प्राप्त केला. ४० षटकांच्या या सामन्यामध्ये चाळीसगाव संघाने नाणेफेक जिंकुन फलंदाजी करण्याचे ठरवले. चाळीसगाव संघाने प्रथम फलंदाजी करताना १८ षटकात १० बळी गमवुन फक्त १०२ धावा केल्या. ज्यात मनमाड संघातील रुषी शर्मा या गोलंदाजाने ५ बळी मिळविले. अभिजीतने ३ तर चिराग निफाडकर व ओम फासळे यांनी प्रत्येकी एक बळी मिळविला. या धावांचा पाठलाग करत असताना मनमाड संघाने ८.५ षटकातच २ बळी गमवुन ह्या सामण्यात एक सहज विजय प्राप्त केला. मनमाड संघाच्या फलंदाजीत रोहित पवार नाबाद 38 धावा व हसन शेख यानी ही नाबाद 34 धावा फटकाविल्या. ५ षटकात गोलंदाजीत 12 धावा देऊन ५ बळी टिपणारा रुषी शर्मा सर्वोत्कृष्ठ गोलंदाज या सामण्याचा सामनावीर ठरला.

भूमी क्रिकेट अकॅडमी, मनमाड चे संचालक व कोच सिध्दार्थ ( भोला ) रोकडे व वाल्मिक रोकडे यांनी या सामण्याचे आयोजन महर्षी भगवान वाल्मिकी स्टेडियम मनमाड येथे केले.

अकॅडमीचे चे मार्गदर्शक श्री. ईरफान मोमीन , राजाभाऊ पगारे , गणेश धात्रक , हबीब शेख , सिद्धार्थ बरडीया , परवेज शेख , कौशल शर्मा , तय्यब शेख , शुभम ( बापु ) गायकवाड , शुभम बिडगर रोहित पवार यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. भुमी क्रिकेट अकॅडमीचे आधारस्तंभ ईरफान भाई मोमीन यांनी खेळाडुंना पुढिल सामण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

अजून बातम्या वाचा..

खेळातून शरीरबला बरोबर मानवी मन-मेंदू सक्षम व बलवान होण्यासाठी विवेकी विचार-वर्तनाची जोड द्यावी : प्रा.अर्जुन कोकाटे : येवला तालुका स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचे शानदार उदघाटन

खेळातून शरीरबला बरोबर मानवी मन-मेंदू सक्षम व बलवान होण्यासाठी विवेकी विचार-वर्तनाची जोड द्यावी : प्रा.अर्जुन कोकाटे : येवला तालुका स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचे शानदार उदघाटन

येवला (प्रतिनिधी) विविध प्रकारच्या खेळातून शरीरबला बरोबर मानवी मन-मेंदू सक्षम व बलवान हिण्यासाठी...

read more
शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाल्याने वडाळी  उपसरपंचांचे सदस्यत्व रद्द

शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाल्याने वडाळी उपसरपंचांचे सदस्यत्व रद्द

नांदगाव नांदगाव तालुक्यातील वडाळी बुद्रुक ग्रामपंचायतीचे उपसरपंच दिलीप केशव नंद यांनी शासकीय जागेत...

read more
गुड शेफर्ड इंग्लिश स्कूल मध्ये तालुकास्तरीय योगासन स्पर्धा – ३० विद्यार्थ्यांचा सहभाग

गुड शेफर्ड इंग्लिश स्कूल मध्ये तालुकास्तरीय योगासन स्पर्धा – ३० विद्यार्थ्यांचा सहभाग

नांदगाव तालुकास्तरीय योगासन स्पर्धेचे गुड शेफर्ड स्कुल मध्ये आयोजन करण्यात आले होते.क्रिडा व युवक...

read more
शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री सचिन पटेल व ज्येष्ठ नागरिक संघर्ष समितीत चर्चा

शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री सचिन पटेल व ज्येष्ठ नागरिक संघर्ष समितीत चर्चा

मनमाड शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात येथील ज्येष्ठ नागरिक संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिनांक ९...

read more
.