loader image
[ays_poll id=7]

के आर टी विद्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

Feb 19, 2023


के आर टी विद्यालय शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली येथील कवि रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी शाळेचे विश्वस्त धनंजय निंभोरकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यावेळी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर.उपप्राचार्य वैभव कुलकर्णी .मुख्याध्यापक दीपक व्यवहारे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता पहिली व इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी केले होते. इयत्ता पहिलीच्या आराध्या शंकर आव्हाड हिने आपल्या भाषणात म्हटले. “सह्याद्रीच्या कुशीतून हिरा चमकला भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर फडकला हातात तलवार घेऊन शत्रूंवर गरजले महाराष्ट्रात असे एकच छत्रपती होऊन गेले.” 19 फेब्रुवारी 1630 या मंगलदिनी शिवनेरी किल्ल्यावर शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. सगळीकडे आनंदी आनंद झाला. जिजामाता कडून त्यांना उत्तम संस्कार मिळाले. लहान वयातच त्यांनी स्वराज्य निर्माण करण्याचे मोठे स्वप्न पाहिले आणि त्यासाठी त्यांनी अनेक जीवास जीव देणारे मावळे तयार केले. मावळ्यांच्या साथीने केलेले अनेक पराक्रम त्यांच्या कार्याची महती पटवून देतात. शिवाजी महाराजांनी नेहमी स्त्रियांना माता,ताई समान मांनले. आणि त्यांच्यावर अन्याय करणाऱ्यांचा चांगलाच बंदोबस्त केला. त्यांनी संपूर्ण आयुष्य प्रजेच्या कल्याणासाठी खर्च केले .त्यांनी नेहमीच सर्वधर्मांचा आदर केला.असे आदर्श राजे जरी आज आपल्यात नसले तरी त्याचे विचार कार्य त्याग आजही आपल्याला प्रेरणा देतात .इयत्ता पहिलीचा शिवम ईश्वर खैरनार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले शिवजन्मोत्सवानिमित्त पोवाडा, भाषण, गर्जना, व वेशभूषा करणारी विद्यार्थी इयत्ता पहिलीचे आरुष विंचू आरव पराशर .सुधांशू अग्रवाल यांनी शिवाजी महाराजांची वेशभूषा केली. इयत्ता सहावीच्या ओवी सांगळे हिने शिवाजी महाराजांविषयी आपले मनोगत व्यक्त केले. इयत्ता सहावीच्या स्वयंम् सरोद याने आपले विचार मांडले. आसते कदम आसते कदम आसते कदम महाराज गडपती गजअश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्नश्रीपती अष्टवधानजागृत अष्टप्रधानवेस्टीत न्यायालंकारमंडीत शास्त्रस्त्रशास्त्र पारंगत राजनीतिधुरंदर प्रौढप्रताप पुरंदर क्षत्रियकुलावंतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्री, श्री ,श्री ,श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय।. शिव जन्मोत्सवानिमित्त स्पंदन सोनवणे हिने पोवाडा म्हटला अहो राजे ओ या विद्यार्थ्यांना सौ पंचशीला पगारे आणि विलास कैचे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन अक्षता शिनकर हिने केले.


अजून बातम्या वाचा..

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

मनमाड - भारतीय जनता पार्टी देश स्तरावर विविध क्षेत्रामध्ये काम करीत असते कामगार क्षेत्रामध्ये...

read more
.