loader image
[ays_poll id=7]

मनमाडला बुधवार पासून रंगणार कबड्डी सामने

Feb 20, 2023

कबड्डीची पंढरी असलेल्या मनमाड शहरात बुधवार दिनांक २२ ते २८ फेब्रुवारी दरम्यान मनमाड कबड्डी लीग स्पर्धेचा दुसरा हंगाम आयोजित करण्यात आला आहे. खेळाडूंमध्ये एकूण १९ सामने एकाच मैदानावर सात दिवस होणार आहेत. यासाठी सहा संघांची निवड करण्यात आल्याची माहिती नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष राजेंद्र पगारे, प्रमुख कार्यवाह मोहन गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जय भवानी व्यायाम शाळेच्या हॉलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कबड्डी असोसिएशनचे सहकार्यवाह सतीश सूर्यवंशी, सदस्य वाल्मिक बागुल, पंच प्रमुख राजेंद्र निकुंभ, सुधाकर कातकडे, रमेश केदारे उपस्थित होते. यावर्षी पंकज खताळ यांच्या सहकार्याने आजी-माजी खेळाडू व नाशिक जिल्हा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने मनमाड कबड्डी लीग स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामाचे आयोजन येत्या २२ ते २८ फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले आहे. महर्षी वाल्मिकी क्रीडा संकुलावर सायंकाळी ६ ते ९ दरम्यान हे सामने खेळविले जाणार आहेत. एकाच मैदानावर दररोज फक्त तीन सामने खेळविले जाणार आहेत. दि.२२ रोजी सायंकाळी ५ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. यात सहा संघ आणि सहा प्रशिक्षक आहेत. एकूण ९८ खेळाडूंमध्ये १९ सामने सात दिवस होणार आहेत. या लीग स्पर्धेसाठी २१-२१ दिवसांची दोन शिबिरे घेऊन त्यातून खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. खेळण्याच्या जागेनुसार व कौशल्यानुसार या खेळाडूंची सहा संघांत विभागणी करण्यात आली. सर्व संघ तुल्यबळ व्हावेत, यासाठी विशेष दक्षता घेण्यात आली आहे.

पापा थॉमस, जयकुमार फुलवानी, अरबाज काजी, सागर गरूड, विजय बेदाडे व प्रमोद गांगुर्डे, बाळा सांगळे हे सहा संघमालक आहेत. या स्पर्धेसाठी १५ हजार रुपयांचे पहिले बक्षीस रिपाइंचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र आहिरे, ११ हजारांचे दुसरे बक्षीस आकाश वाघमारे, ७ हजारांचे तिसरे बक्षीस अन्वर पठाण, तर ५ हजारांचे चौथे बक्षीस लियाकत शेख यांच्या वतीने देण्यात येणार आहे.

प्रत्येक सामन्यातील सामनावीराला वैयक्तिक बक्षीस दिले जाणार आहे. यावेळी आयोजन प्रमुख रमेश केदारे, बंटी सोनवणे, भूषण दरगुडे, प्रसाद दरगुडे, आयण शेख, समीर शेख, मयूर बनसोडे, निर्माण मोरे आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

पाच वर्षाच्या कमबॅक नंतर अर्जुन पुरस्कार विजेते दत्तू भोकनळ यांचे चंदेरी यश.. महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत सीनियर नॅशनल रोईंग स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई..

पाच वर्षाच्या कमबॅक नंतर अर्जुन पुरस्कार विजेते दत्तू भोकनळ यांचे चंदेरी यश.. महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत सीनियर नॅशनल रोईंग स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई..

नाशिकचे अर्जुन वीर तसेच आशियाई सुवर्ण पदक विजेते ओलंपियन दत्तू बबन भोकनळ यांनी दिनांक 20...

read more
मनमाड काँग्रेसचे माजी नगरसेवक मिलिंद उबाळे यांचा आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश

मनमाड काँग्रेसचे माजी नगरसेवक मिलिंद उबाळे यांचा आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश

मनमाड नगरपालिकेचे काँग्रेसचे माजी नगरसेवक मिलिंद उबाळे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह आज आमदार...

read more
एच.ए.के.हायस्कुल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये मार्च २०२३ इयत्ता १० वी परीक्षेची आसनव्यवस्था जाहीर

एच.ए.के.हायस्कुल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये मार्च २०२३ इयत्ता १० वी परीक्षेची आसनव्यवस्था जाहीर

मनमाड:- इ.१० वी परीक्षा मार्च २०२३ केंद्र क्रमांक १३७६ एच.ए.के. हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज, मनमाड या...

read more
नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघ आयोजित ‘मातीचे गड-किल्ले बनवणे’ स्पर्धेला उत्कृष्ट प्रतिसाद….स्पर्धेचे उद्या रविवारी होणार निकाल जाहीर

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघ आयोजित ‘मातीचे गड-किल्ले बनवणे’ स्पर्धेला उत्कृष्ट प्रतिसाद….स्पर्धेचे उद्या रविवारी होणार निकाल जाहीर

मनमाड : योगेश म्हस्के - महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती देशभरात...

read more
कवी रबिन्द्रनाथ टागोर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये कवि रबिंद्रनाथ टागोर एज्युकेशन सोसायटी या संस्थेचा २० वा वर्धापन दिन मोठया उत्साहात साजरा

कवी रबिन्द्रनाथ टागोर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये कवि रबिंद्रनाथ टागोर एज्युकेशन सोसायटी या संस्थेचा २० वा वर्धापन दिन मोठया उत्साहात साजरा

मनमाड येथील कवी रबिन्द्रनाथ टागोर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये कवि रबिंद्रनाथ टागोर एज्युकेशन सोसायटी...

read more
.