मनमाड येथील कवी रबिन्द्रनाथ टागोर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये कवि रबिंद्रनाथ टागोर एज्युकेशन सोसायटी या संस्थेचा २० वा वर्धापन दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला श्री. सचिन बिडवे आणि सी. प्रतिभा पवार यांनी इशस्तवन सादर करून सर्व संस्थापक- विश्वस्तांच्या हस्ते सरस्वती आणि टागोरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पुजन करण्यात आले. शाळेच्या सर्व शिक्षकांकडून संस्थापक- विश्वस्तांना भेटवस्तू देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देतांना प्रातिनिधीक स्वरूपात श्री. मुकेश मिसर यांनी शाळेचा २० वर्षांचा प्रवास, त्यातील चढ-उतार यांचा सुरेख आलेख मांडला. शाळेच्या या यशामध्ये सर्व संस्थाचालक, शाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व असंख्य पालकांचा विश्वास लाभल्याचे समाधान वाटते. भविष्यातही शाळेच्या माध्यमातून दर्जेदार गुणवत्तापूर्वक शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील राहू असे नमूद केले.
याप्रसंगी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात इ. ७ वीच्या प्रज्ञेश सतिष आहिरे या विदयार्थ्याने आपल्या सुमधून बासरीवादनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. तर इ. ९ वीच्या कु. श्रावणी अमर चव्हाण व कु. हेमांगी मुलचंदानी या विदयार्थ्यांनी सुंदर नृत्य सादर केले.
कु. संध्या सोनवणे आणि सौ. अनिता शाकाव्दिपी या शिक्षिकांनी आपले मनोगत सादर केले तर श्री. सचिन बिडवे यांनी गीत सादर केले. संस्थेच्या दोन दशकाच्या दमदार प्रवासाच्या निमित्ताने शालेय इमारतीला ठिकठिकाणी तोरण, पुष्पहार आणि रांगोळी सजावट करण्यात आली होती. इ. ५ वीच्या विदयार्थिनींनी हस्तकलेच्या माध्यमातून संस्थेच्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या. तर शिक्षकांनी शाळेच्या मागील २० वर्षाच्या प्रवासाचे ‘बोलके व मोजके’ फोटो प्रदर्शन भरवले होते..
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व संस्थापक – विश्वस्तांच्या हस्ते केक कापून संस्थेचा वाढदिवस साजरा करण्यात आला. संस्थेच्या वाढदिवसानिमित्त सर्व विदयार्थ्यांना लाडू वाटप करण्यात आले. कार्यक्रमास संस्थेच्यावतीने श्री. वैभव कुलकर्णी, श्री. दिपक व्यवहारे, श्री. धनंजय निंभोरकर, श्री. मनोज छाबडा आणि श्री. तुषार चौधरी हे उपस्थित होते..
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कु. अमिता झाडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचा-यांचे सहकार्य लाभले.












