loader image
[ays_poll id=7]

मनमाडला बुधवार पासून रंगणार कबड्डी सामने

Feb 20, 2023

कबड्डीची पंढरी असलेल्या मनमाड शहरात बुधवार दिनांक २२ ते २८ फेब्रुवारी दरम्यान मनमाड कबड्डी लीग स्पर्धेचा दुसरा हंगाम आयोजित करण्यात आला आहे. खेळाडूंमध्ये एकूण १९ सामने एकाच मैदानावर सात दिवस होणार आहेत. यासाठी सहा संघांची निवड करण्यात आल्याची माहिती नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष राजेंद्र पगारे, प्रमुख कार्यवाह मोहन गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जय भवानी व्यायाम शाळेच्या हॉलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कबड्डी असोसिएशनचे सहकार्यवाह सतीश सूर्यवंशी, सदस्य वाल्मिक बागुल, पंच प्रमुख राजेंद्र निकुंभ, सुधाकर कातकडे, रमेश केदारे उपस्थित होते. यावर्षी पंकज खताळ यांच्या सहकार्याने आजी-माजी खेळाडू व नाशिक जिल्हा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने मनमाड कबड्डी लीग स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामाचे आयोजन येत्या २२ ते २८ फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले आहे. महर्षी वाल्मिकी क्रीडा संकुलावर सायंकाळी ६ ते ९ दरम्यान हे सामने खेळविले जाणार आहेत. एकाच मैदानावर दररोज फक्त तीन सामने खेळविले जाणार आहेत. दि.२२ रोजी सायंकाळी ५ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. यात सहा संघ आणि सहा प्रशिक्षक आहेत. एकूण ९८ खेळाडूंमध्ये १९ सामने सात दिवस होणार आहेत. या लीग स्पर्धेसाठी २१-२१ दिवसांची दोन शिबिरे घेऊन त्यातून खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. खेळण्याच्या जागेनुसार व कौशल्यानुसार या खेळाडूंची सहा संघांत विभागणी करण्यात आली. सर्व संघ तुल्यबळ व्हावेत, यासाठी विशेष दक्षता घेण्यात आली आहे.

पापा थॉमस, जयकुमार फुलवानी, अरबाज काजी, सागर गरूड, विजय बेदाडे व प्रमोद गांगुर्डे, बाळा सांगळे हे सहा संघमालक आहेत. या स्पर्धेसाठी १५ हजार रुपयांचे पहिले बक्षीस रिपाइंचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र आहिरे, ११ हजारांचे दुसरे बक्षीस आकाश वाघमारे, ७ हजारांचे तिसरे बक्षीस अन्वर पठाण, तर ५ हजारांचे चौथे बक्षीस लियाकत शेख यांच्या वतीने देण्यात येणार आहे.

प्रत्येक सामन्यातील सामनावीराला वैयक्तिक बक्षीस दिले जाणार आहे. यावेळी आयोजन प्रमुख रमेश केदारे, बंटी सोनवणे, भूषण दरगुडे, प्रसाद दरगुडे, आयण शेख, समीर शेख, मयूर बनसोडे, निर्माण मोरे आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

लासलगाव जवळ रेल्वे लाईनचे काम करणाऱ्या चार कामगारांना टॉवर वॅगन ट्रेन ने उडवले ; चौघांचा दुर्दैवी मृत्यू

लासलगाव जवळ रेल्वे लाईनचे काम करणाऱ्या चार कामगारांना टॉवर वॅगन ट्रेन ने उडवले ; चौघांचा दुर्दैवी मृत्यू

नाशिक जिल्ह्यातील लासलगाव रेल्वे स्थानकाजवळ आज पहाटे भीषण अपघात झाला आहे. लासलगाव येथे टॉवर वॅगन...

read more
रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्या करणार्यांना कडक शासन व्हावे – नांदगाव मनमाड पत्रकार संघाची मागणी

रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्या करणार्यांना कडक शासन व्हावे – नांदगाव मनमाड पत्रकार संघाची मागणी

मनमाड : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्त्या करणाऱ्यांना कडक...

read more
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त नांदगाव मनमाड पत्रकार संघातर्फे शिवरायांच्या गड किल्ल्यांची प्रतिकृती बनविण्याची स्पर्धेचे आयोजन

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त नांदगाव मनमाड पत्रकार संघातर्फे शिवरायांच्या गड किल्ल्यांची प्रतिकृती बनविण्याची स्पर्धेचे आयोजन

मनमाड :  'चला मग किल्ला बनवूया, मातीशी नाते जोडू या' हे ब्रीद वाक्य घेऊन आगामी शिवजयंती निमित्त...

read more
मनमाड जंक्शन स्थानकावरून मुंबई ते शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीट मिळावे – आमदार कांदे यांची मागणी

मनमाड जंक्शन स्थानकावरून मुंबई ते शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीट मिळावे – आमदार कांदे यांची मागणी

मुंबईहून शिर्डीला जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला मनमाड येथे थांबा असूनही, त्या रेल्वेचे तिकीट या...

read more
मनमाड जंक्शन स्थानकावरून मुंबई ते शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीट मिळावे – आमदार कांदे यांची मागणी

मनमाड कुर्ला टर्मिनस गोदावरी एक्सप्रेस कायमस्वरूपी सुरू करा – आमदार कांदे यांची मागणी

मनमाड शहर रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने मनमाड कुर्ला टर्मिनस "गोदावरी एक्स्प्रेस" कायमस्वरूपी...

read more
मुख्यमंत्री शिंदेच्या हस्ते करंजवन योजनेचे सोमवारी उद्घाटन – मनमाडला जय्यत तयारी

मुख्यमंत्री शिंदेच्या हस्ते करंजवन योजनेचे सोमवारी उद्घाटन – मनमाडला जय्यत तयारी

मुख्यमंत्र्यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जाणारे मनमाड नांदगाव चे आमदार सुहास कांदे यांनी...

read more
.