loader image
[ays_poll id=7]

नांदगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

Feb 20, 2023

नांदगाव – हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज कि जय, जय भवानी.. जय शिवाजी… घोषणा व बॅन्ड यांच्या दणदणाटात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमीत्त येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून भव्य मिरवणूक सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती व शिवप्रेमींच्या वतीने शहरातून काढण्यात आली.

मिरवणुकीची सुरवात आमदार सुहास कांदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व आरती करत मिरवणुकीतील रथाची पूजा करून मिरवणुकीला सुरूवात करण्यात आली. यावेळी आमदार

सुहास कांदे यांनी बॅन्डच्या तालावर शिवप्रेमी व नागरिक यांच्या सोबत ठेका धरला.

श्रीकांत वाळके या युवकाने छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा साकारली. यावेळी मिरवणुकी दरम्यान विविध वाद्यवृदांच्या तालावर तरून थिरकले. तर वारकरी मंडळ, लेझीम पथक, शिवकालीन कसरतीचे दाणपट्टा, तलवारबाजी, ढोलताशा, मावळा पथक आदि शिवकालीन खेळाबरोबरच सहभागी झाले होते.

दरम्यान, सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांना सार्वजनिक शिवजयंती समिती अध्यक्ष

सोमनाथ सागर यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा दुग्धाभिषेक करण्यात आला. तर शहरातून युवक व युवती यांनी दुचाकीला भगवे झेंडे फडकवीत शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. मिरवणुकीचे शहरातून ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. यावेळी जय भवानी.. जय शिवाजी… घोषणा देवून परिसर दणाणून सोडला होता. सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. मिरवणुकीत लहान मुलांसह युवक- युवती, नागरिक, शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

  गुरुवार 01 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

  गुरुवार 1 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट असोसिएशन...

read more
ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

  पुणे - जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रंथालयांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी, शासन प्रयत्न...

read more
आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मनमाड...

read more
.