loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ-श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिर सभा मंडपाचे आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या हस्ते भूमिपूजन

Feb 21, 2023


 

नांदगाव शहरातील श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिर परिसरासाठी आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून साठ लाख रुपयांचा निधी सभामंडपच्या कामासाठी मंजूर करण्यात आला. आज या सभा मंडपाचे भूमिपूजन आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाच्याअध्यक्षस्थानी जेष्ट नेते बापूसाहेब कवडे हे होते.तर मंचावर माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बनकर,बबी काका कवडे,राजाभाऊ मोरे,श्री विष्णू निकम सर, श्याम दुसाने,रमेश पगार,नांदगाव नगर पालिकेचे मुख्यअधिकारी धांडे,अमृत पटेल अनिलशेट करवा, राजाभाऊ देशमुख,बाळासाहेब मोकळ, नगरसेवक वाल्मीक टिळेकर,अमोल शेठ नावंदर, प्रकाश शेठ गायकवाड, पैठणकर तात्या,ईश्वर भाऊ मोकळ,सादिक तांबोळी उपस्थित होते.
श्री विष्णू निकम सर यांनी प्रस्तावना करताना सांगितले की
आमदार सुहास आण्णा कांदे यांनी अपेक्षिले त्याहून जास्त आम्हाला दिले असा दानशूर आमदार आम्ही या आधी पहिला नाही, या आधी बलाढ्य आमदार होऊन गेले पण दान करण्याची वृत्ती ही फक्त आपण दाखवली या बद्दल सावता महाराज समिती तसेच उपस्थितांकडून त्यांनी आभार व्यक्त केले. सर्व जाती पंथाला सोबत घेऊन चालणारा आमदार लाभल्याचे भाग्य आहे असेही ते म्हणाले.
ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांनी मनोगत व्यक्त करताना आमदार सुहास आण्णा यांनी चौफेर आपले विकास कार्य सुरू ठेवले असून पाण्यासारखे पुण्याचे काम हाती घेऊन विविध योजना मार्गी लावल्या आता शेती सिंचनाला आपला मोर्चा वळवावा असे ते म्हणाले.
आपल्या भाषणात बोलतांना आमदार सुहास आण्णा कांदे यांनी मी आमदार झालो त्याच दिवशी मी सर्व जाती धर्माचा, पक्षाचा, अगदी शेवटच्या स्थरावरच्या नागरिकाचा आमदार झालो आणि प्रत्येकाची सेवा करणे हे माझे कर्तव्य असल्याचे समजतो असे ते म्हणाले. मी आजपर्यंत मतदारसंघात अनेक विकास कामे करत असताना विविध पाणी योजना मार्गी लावल्या आता पुढचे लक्ष हे शेती सिंचनाचे असल्याचे त्यांनी सांगितले. आपण मला कधीही हाक द्या मी आपल्यासाठी सदैव उपलब्ध राहील असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला.
सुरुवातीलाच आमदार सुहास आण्णा कांदे यांचे आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली, ह. भ. प.गुरुकुल च्या विद्यार्थ्यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात त्यांचे स्वागत केले .
सूत्रसंचालन प्रशांत खैरनार यांनी केले तर बाळासाहेब मोकळ यांनी आभार मानले.
या प्रसंगी नांदगाव शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .


अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ-भाजपा +महायुतीच्या उमेदवार डॉ भारती पवार यांचे प्रचारार्थ मतदार संवाद भेटीला उस्फुर्त प्रतिसाद

बघा व्हिडिओ-भाजपा +महायुतीच्या उमेदवार डॉ भारती पवार यांचे प्रचारार्थ मतदार संवाद भेटीला उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड - शहरातील मुख्य बाजार पेठ मध्ये दिंडोरी लोकसभा मतदार संघातील भाजपा + शिवसेना (शिंदे गट )...

read more
बघा व्हिडिओ-नांदगाव छत्रपती संभाजीनगर रोडवर गंगाधरी येथे एस. टी बस अल्टोगाडी च्या अपघातात तीन मुत्यूमुखी

बघा व्हिडिओ-नांदगाव छत्रपती संभाजीनगर रोडवर गंगाधरी येथे एस. टी बस अल्टोगाडी च्या अपघातात तीन मुत्यूमुखी

  नांदगाव सोमनाथ घोंगाणे नांदगाव शहरातील गंगाधरी गावाजवळ एस. टी . बस व अल्टो कारच्या अपघातात...

read more
शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवाची काल्याच्या किर्तनाने सांगता

शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवाची काल्याच्या किर्तनाने सांगता

मनमाड : योगेश म्हस्के शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवा निमित्ताने आयोजित...

read more
बघा व्हिडिओ-नांदगांव तालुक्यात पावसाने नुकसान झाडे कोलमडली, फळबागांचे नुकसान, पाझर तलावात पाणी साचले, पाणी टंचाई तीव्रता कमी झाली

बघा व्हिडिओ-नांदगांव तालुक्यात पावसाने नुकसान झाडे कोलमडली, फळबागांचे नुकसान, पाझर तलावात पाणी साचले, पाणी टंचाई तीव्रता कमी झाली

  नांदगाव : मारुती जगधने नांदगाव शहर व तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांच्या मुसळधार पाऊसाचे बे...

read more
मनमाड येथील कीर्तन सोहळ्यात हजारो भाविकांनी घेतला “खीर-मांड्यांचा” आस्वाद ….आज कीर्तन सोहळ्याची सांगता

मनमाड येथील कीर्तन सोहळ्यात हजारो भाविकांनी घेतला “खीर-मांड्यांचा” आस्वाद ….आज कीर्तन सोहळ्याची सांगता

योगेश म्हस्के मनमाड : शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवा निमित्ताने आयोजित...

read more
.