कर्करोग विरुद्धच्या लढ्यात सामील व्हा ! असे आवाहन करत मेडीकव्हर हॉस्पिटलने नाशिक येथे सर्वसमावेशक हेमॅटोलॉजी आणि ऑन्कोलॉजी डे केअर सेवा आज पासून सुरू केली आहे.
फोटो कॅप्शन : डॉ सुशील पारख , समीर तुळजापूरकर , डॉ निलेश वासेकर , डॉ सुदर्शन पंडित , डॉ लविन विल्सन , डॉ अमरीश चॅटर्जी , पियुष नांदेडकर आणि आदी.
दि. २१ फेब्रुवारी , नाशिक प्रतिनिधी : जेव्हा लोक चांगले आरोग्य, संपत्ती आणि सुरक्षिततेचा आनंद घेतात तेव्हा ते जीवनात आनंदी व व्यस्त असतात. त्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होईपर्यंत ते त्यांच्या आरोग्याबद्दल जागरूक नसतात परंतु कर्करोग हा एक असा आजार आहे. त्याचे निदान झाल्यास त्वरित उपचार आवश्यक असतात.
आपल्या कर्करोगाच्या रुग्णांना सर्वोत्तम आणि वैयक्तिकृत कर्करोग उपचार देण्यासाठी इंदिरा नगर, नाशिक , येथील अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलने रुग्णांसाठी रक्ताच्या संभंधित कर्करोग आणि त्यावरील उपचार यासह नवीन अत्याधुनिक कर्करोग निदान व उपचार सेवा सुरू केल्या आहेत.
मेडिकव्हर हेमॅटोलॉजी आणि ऑन्कोलॉजी डे केअर सेवेचे उद्घाटन मेडिकल डायरेक्टर तथा बालरोग तज्ञ् डॉ सुशील पारख यांनी केले. या प्रसंगी ते म्हणाले, नाशिक मधील विशेषत: लहान मुलांच्या, कर्करोगाशी लढा देत असलेल्या लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी मेडिकव्हर हॉस्पिटलच्या वचनबद्धतेचे नेहमीच कौतुक झाले आहे. पुढे ते म्हणाले, “कर्करोगाचा सामना करण्यासाठी मेडिकव्हर हॉस्पिटलचा धाडसी पुढाकार पाहून मला आनंद झाला आहे. या प्रगत कर्करोग सुविधेचा शुभारंभ आपल्या शहरातील असंख्य कर्करोग रुग्णांना निश्चितपणे लाभ देईल.
मेडिकव्हर हेमॅटो -ऑन्कॉलॉजी विभागात रक्त विकार तज्ञ् डॉ. निलेश वासेकर , डॉ. सुदर्शन पंडित , मेडिकल ऑनकॉलॉजी डॉ लवीन विल्सन , सर्जिकल ऑनकॉलॉजी डॉ अमरीश चॅटर्जी यांचा आणि अत्यंत अनुभवी डॉक्टरांचा व स्टाफचा समावेश आहे.
या प्रसंगी बोलताना रक्त विकार तज्ञ् डॉ. निलेश वासेकर म्हणाले, रक्ताच्या संभंधित कर्करोगने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी हि नवीन कॅन्सर सेवा सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे, त्यामुळे गरजूना परवडणाऱ्या दरात वैयक्तिक आणि रुग्ण-केंद्रित काळजी प्रदान करता येईल. आमचे अत्यंत कुशल हेमॅटॉलॉजिस्ट व ऑन्कोलॉजिस्ट आमच्या रुग्णांना सर्वोत्तम उपचार सेवा देण्यासाठी सर्वात प्रगत तंत्रे आणि तंत्रज्ञान वापरण्यास वचनबद्ध आहेत. पुढे ते म्हणाले, मागील वर्षभरात १० कर्करोग ग्रस्त रुग्णांवर यशस्वी रित्या अस्थी मज्जा प्रत्यारोपण (Bone Marrow Transplant) करण्यात आले. तसेच अक्युट लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया (ALL) या आजाराने ग्रस्त २५ रुग्णावर केमोथेरेपी द्वारे तर लिम्फोमा आणि मायेलोमा या आजाराने प्रभावित २५-३० रुग्णावर यशस्वी उपचार करण्यात आले असून त्याच्या प्रकृती मध्ये दैनंदिन भेटी दरम्यान सुधारणा दिसून आली आहे. वर्षभरात जवळपास १०० बोन मॅरो प्रोसिजर करण्यात आल्या आहेत. यासोबतच काही रुग्णांना दैनंदिन उपचाराची गरज भासत असते अशा रुग्णांना प्रत्येक वेळी रुग्णालयात दाखल न करता डे केअर बेसिस वर लवकर उपचार मिळावेत यासाठी हि डे केअर सुविधा आम्ही खऱ्या अर्थाने सुरू करत आहोत. यामध्ये रक्त विकाराने ग्रस्त रुग्णावर केमोथेरपी व त्या संबंधित उपचार व डे केअर प्रोसिजर केल्या जाणार आहेत
या प्रसंगी पत्रकारांशी संवाद साधताना , केंद्र प्रमुख समीर तुळजापूरकर म्हणाले, “हेमॅटोलॉजी आणि ऑन्कोलॉजी डे केअर सेवा सुरू करणे हा मेडीकव्हर हॉस्पिटलसाठी एक मैलाचा दगड आहे, ज्याचा उद्देश नाशिक मधील रुग्णांना जागतिक दर्जाचे उपचार प्रदान करणे आहे. मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये, आम्ही आमच्या डॉक्टरांच्या टीम द्वारे सर्वसमावेशक प्रयत्नांमध्ये सर्वोत्कृष्ट कर्करोग प्रतिबंध, निदान आणि उपचार प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहोत.”
———————————–
सर्वात प्राणघातक कर्करोगामध्ये रक्ताच्या कर्करोगाचा सहावा क्रमांक आहे. रक्ताच्या कर्करोगाचे तीन मुख्य प्रकार आहेत. ल्युकेमिया, लिम्फोमा आणि मायलोमा. ल्युकेमिया हा सर्वाधिक आढळणारा रक्ताचा कर्करोग आहे. त्यानंतर लिम्फोमा आणि मायलोमा रुग्ण आढळतात. दरवर्षी देशभरात ल्युकेमियाचे ३५,००० नवे रुग्ण, लिम्फोमाचे ३२,००० नवे रुग्ण तर मायेलोमाचे ७,००० नवे रुग्ण आढळतात आणि रक्ताच्या कर्करोगामुळे दरवर्षी सुमारे ५०,००० व्यक्तींचा मृत्यू होतो. त्यामुळे लोकांना रक्ताच्या कर्करोगाविषयी जाणीव करून देणं महत्त्वाचं आहे.













