Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ-सायरन वाजले आणि काही क्षणात दाखल झाली एनडीआरएफची टीम

Feb 22, 2023

आज सकाळ पासूनच मनमाड रेल्वे परिसरात धावपळ सुरू होती काहीतरी विपरीत घडलय या धास्तीने सगळे एकदम दबावाखाली दिसत होते तितक्यात चार सायारन वाजले आणि नक्कीच काहीतरी घडलय याची खात्री झाली.मध्य रेल्वे चे मनमाड हे स्थानक नेहमीच गर्दीने खचाखच भरलेले असते या स्थानकांवर सुरक्षा चे सर्व मापदंड पाळत असताना जर काही चूक झाली आणि रेल्वेचा मोठा अपघात झाला तर काय ? या साठी रेल्वे सदैव तैनात असते.पण आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास मनमाड मध्ये राष्ट्रीय अपादा प्रबंधन टीम च्या मदत करणाऱ्या गाड्या दिसल्या आणि काहीतरी घडले आहे या कुतूहलाने नागरिकांच्या मनात शंका आली.
राष्ट्रीय आपदा प्रबधन टीम आणि सोबतच रेल्वेची अपघात नियंत्रित करणारी टीम यांचा संयुक्त सराव असल्याने रेल्वेच्या कोचिंग विभागात अपघात घडल्या नंतर चे मदत कार्य व त्या साठीची तत्परता यांचे प्रात्यक्षिक करण्यात आले.या साठी दोन रेल्वेचे डबे एकमेका वर अपघात झालेल्या स्थितीत ठेवण्यात आले होते आणि या डब्या मध्ये अपघातग्रस्त प्रवासी बसवण्यात आले त्यांना जखमी अवस्थेत वाचवण्यासाठी 140 टन वजनाची क्रेन सुसज्ज करण्यात आली होती.
रेल्वे डॉक्टर आणि सगळे विभाग या साठी सज्ज करून ठेवण्यात आले होते.सायरन वाजवत अनेक अँब्युलन्स धावत होत्या काही क्षणात सगळ्या प्रवासी वर्गाला वाचवण्यात आले
एन डी आर एफ चे जवान यांनी सगळ्या घटनेत ताबा मिळवत रेल्वेच्या सहकार्याने अपघात पासून वाचण्याचे प्रात्यक्षिक यशस्वी रित्या पूर्ण केले.या कामी स तथा मा यांत्रिक विभाग,स्काऊट गाईड,सुरक्षा विभाग,दूरसंचार विभाग,चिकिस्ता विभाग,इंजिनियरिंग विभाग आणि भुसावळ मंडळ येथील संबधित विभाग यांचे सहकार्य लाभले.

अजून बातम्या वाचा..

तालुका तात्काळ दुष्काळी जाहीर करावा – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने तहसीलदारांना निवेदन

तालुका तात्काळ दुष्काळी जाहीर करावा – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने तहसीलदारांना निवेदन

पावसाने पाठ फिरवल्यामुळे नांदगाव तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांसमोर...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]