loader image
[ays_poll id=7]

के आर टी शाळेत संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी

Feb 24, 2023

कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये संत गाडगेबाबा यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शाळेचे मुख्याध्यापक दीपक व्यवहारे .जनरल सेक्रेटरी वैभव कुलकर्णी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर. विश्वस्त धनंजय निंभोरकर. शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता पहिली व इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी केले होते. इयत्ता पहिलीच्या आदिती केदारे. मयंक पगारे .तेजस्विनी चव्हाण यांनी संत गाडगेबाबा यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले .इयत्ता सहावीच्या निशिगंधा उबाळे. चैतन्य डोंगरे. प्रियंका उगले .यांनी संत गाडगेबाबां विषयी आपले विचार प्रकट केले. संत गाडगेबाबा हे महाराष्ट्रातील एक महान संत आणि समाजसुधारक होते. त्यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 अमरावती जिल्ह्यातील शेंडगाव या गावी झाला. संत गाडगेबाबा बाबांचा पेहराव अंगात फाटक्या चिंध्यांचा सदरा फटके ठिगळ लावलेले धोतर एका हातात खराटा व दुसऱ्या हातात गाडगे पायात फाटक्या चपला असा होता .पहाटे गाव जागा व्हायच्या अगोदर ते खराट्याने गाव स्वच्छ करीत .संत गाडगेबाबांनी समाजातील अनिष्ट रूढी परंपरा व अनैतिक चालीरीती यांचा विरोध केला.लोकांचे अज्ञान व अंधश्रद्धा पाहून त्यांनी लोकशिक्षणावर भर दिला .संत गाडगेबाबांना भजन कीर्तनाची फार आवड होती. त्यामुळे त्यांनी कीर्तनातून लोकजागृतीचा मार्ग निवडला त्यांनी गरीब कष्टकरी तसेच अपेक्षितांची सेवा हीच देवाची भक्ती मानली. “कणकण करुनी कोटी केले. कण न खर्चिला स्वहितासाठी वणवण फिरुनी कणकण झिजले बाबा दुःखी जनतेसाठी”….. “गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला” असे म्हणत आपली सेवा त्यांनी कायम चालू ठेवली. या विद्यार्थ्यांना सौ पंचशीला पगारे .विलास कैचे यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भक्ती शर्मा हिने केले.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

  *मनमाड (दि. ११ नोव्हेंबर) - एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मनमाड येथे भारताचे पहिले...

read more
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
.