loader image
[ays_poll id=7]

कवी रबिन्द्रनाथ टागोर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिवजयंती साजरी

Feb 24, 2023

दिनांक:१९/०२/२०२३
मनमाड येथील कवी रबिन्द्रनाथ टागोर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन-प्राचार्य मुकेश मिसर हे होते. प्राचार्य मुकेश मिसर यांच्यासह संस्थेचे जनरल सेक्रेटरी वैभव कुलकर्णी, प्राथमिकचे मुख्याध्यापक दिपक व्यवहारे, उपाध्यक्ष श्री. धनंजय निंभोरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले.
प्राचार्य श्री. मुकेश मिसर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचे विविध पैलू उलगडून दाखवितांना त्यांच्या जीवनकार्याचा गौरव केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या युध्दनिती आणि राज्यकारभाराबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले. लोककल्याणकारी राज्य निर्मिले म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांना ते रयतेचे राजे ओळखले जाते. असे त्यांनी प्रतिपादन केले.
कार्यक्रमास संस्थेचे जनरल सेक्रेटरी वैभव कुलकर्णी, प्राथमिकचे मुख्याध्यापक दिपक व्यवहारे, उपाध्यक्ष श्री. धनंजय निंभोरकर यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमास उपस्थित सर्व शिक्षकेतर कर्मचारी आणि विदयार्थी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करून त्यांना वंदन केले.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

read more
.