loader image
[ays_poll id=7]

संत झेवियर हायस्कूल मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

Feb 25, 2023

मनमाड : येथील संत झेवियर हायस्कूल मध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर शाळेचे माननीय मुख्याध्यापक फादर म्याल्कम, पर्यवेक्षिका सिस्टर ज्योत्स्ना, कुमार राज खैरनार व कुमारी श्रद्धा दराडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गर्जा महाराष्ट्र माझा हे राज्य गीत विद्यार्थ्यांनी सामूहिकरीत्या गाऊन कार्यक्रमाची सुरुवात केली. मंचावरील सर्व मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. कुमारी श्रद्धा दराडे हिने आपल्या भाषणातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची किस्से सांगितले.तर कु.राज खैरनार या विद्यार्थ्याने विरश्रीयुक्त पोवाडा सादर केला. शाळेच्या माननीय मुख्याध्यापकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुणवैशिष्ट्यांची ओळख करून दिली. सदरच्या कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन, प्रस्तावना व आभार प्रदर्शन कुमारी समीक्षा कांबळे हिने केले.

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

read more
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
.