loader image
[ays_poll id=7]

मराठी भाषेची ऐतिहासिक महानता – नितिन पांडे

Feb 27, 2023


2220 वर्षा पेक्षा जास्त वय असणाऱ्या मराठी भाषेची ऐतिहासिक महानता आज मराठी भाषा दिन त्या निमित्ताने आपली माय मराठी भाषे ची ऐतिहासिक महानता नवीन पिढीला सादर ज्वालामुखी उद्रेक झाला आणि सहयाद्री पर्वताची निर्मिती झाली तेव्हा पासूनच महाराष्ट्र प्रदेश आणि मराठी भाषे चे अस्तित्व आहे अगदी तीन लाख वर्षा पूर्वी तापी नदीच्या खोऱ्यात आदी मानवाचा सांगाडा सापडला तेव्हा पासून हा महा देश आणि मराठी भाषा अस्तित्वात आहेच अश्म युगा नंतर ऋग्वेद काळात अपरांतक म्हणजे अति पश्चिमे कडील देश म्हणजे च आजचा महाराष्ट्र ओळखला जायचा त्यानंतर सुमारे,नऊ हजार वर्षा पूर्वी महाविष्णू चे सहावे अवतार भगवान श्री परशुराम यांनी संपूर्ण पृथ्वी एकवीस वेळा नि क्षत्रिय केली आणि जिंकलेला भूभाग ब्राह्मण ना दान केला आणि स्वतः साठी कोकण राज्य निर्माण केले सुरत पालघर पासून कोचीन पर्यंत परसलेल्या या राज्याची भाषा ही मराठी च होती त्यानंतर सुमारे सात हजार वर्षा पूर्वी रामायण काळात प्रभू श्रीरामचंद्र चौदा वर्ष वनवासात असताना दंडकारण्यात आले त्यांनी मारीच राक्षस वध केला, शूर्पणखा कांड, माता सीतेचे अपहरण, जटायू वध हे प्रसंग घडले तो प्रदेश महाराष्ट्रच त्या नंतर सुमारे पाच हजार वर्षा पूर्वी महाभारत काळात याच महाराष्ट्र ची नावे कुंतल, विदर्भ अशी होती नळ -दमयंती कथे तील दमयंती ही विदर्भ राजाची कन्या होती तर नळ राजा हा धाराशिव (कालचे उस्मानाबाद )येथील होता त्यांचे नावाने नळदुर्ग किल्ला आहे त्या पुढे मध्य युगीन मौर्या कालीन सम्राट अशोका च्या काळात उज्जैन जवळील क्षेत्राला राष्ट्र संबोधित केल्या चा उल्लेख आढळून येतो, बुद्ध काळात पवित्र बौद्ध धर्म चा प्रसार प्रचार होत होता त्यातील दुर्मिळ ग्रंथा मध्ये उज्जैन नगरी खालचा नर्मदा तिरी च्या प्रदेश ला राष्ट्र म्हटले आहे सम्राट अशोका चा काळातच या आपले प्रदेश ला सर्व प्रथम राष्ट्र म्हणून म्हटले जावू लागले आजही भारतातील सर्व संघराज्य मध्ये राष्ट्र असणारे एकमेव महाराष्ट्र राज्य आहे सातकर्णी /सातवाहन युगात देखील शालिवाहन हा अत्यंत पराक्रमी मराठी राजा होऊन गेला त्याने शक /कुशाण (आजचा युक्रेन, रशिया मधील राज्यकर्ते )यांचा पूर्ण बिमोड केला ही लढाई कुरुक्षेत्र (पानिपत )येथे झाली शालिवाहन राजाची राजधानी ही महाराष्ट्र तील प्रतिष्ठान (आजचे श्री संत एकनाथ महाराज ची पवित्र भूमी असणारे पैठण होय ) येथे होती 1944 वर्षा पूर्वी या शालिवाहन राजाने शक /कुशाण याचा मोठा पराभव केला म्हणून भारतीय कालगणना तेव्हा पासून शके मध्ये मोजली जाते या घटने ला 1944 वर्ष झाली कारण आता 1944 शक सुरु आहे सातवाहन काळ हा इ.स.पूर्व 225 वर्ष आणि इ.स.नंतर 225 वर्ष म्हणजे 450 वर्षाचा होता या काळात मराठी भाषा मराथी नावाने होती सातवाहन काळा नंतर चालुक्य,/राष्ट्रकूट /यादव हे मराठी राजे होऊन गेले त्यांनी मराठी राज्य आणि मराठी भाषा ही संपूर्ण हिंदुस्थान मध्ये नेली नंतर सुमारे 400 वर्ष मोगली साम्राज्य आले पण चार ही पातशाही च्या विरोधात बंड करून त्यांचा बिमोड करून ईश्वर अवतार असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र मध्ये हिंदवी स्वराज स्थापन केले या शिव काळात ही जिथे हिंदवी स्वराज होते तिथे पर्यंत मराठी भाषा होती पुढे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, आणि पेशवाई काळात ही राज्य कारभार ची भाषा मराठी ची होती राघोबादादा पेशवे नी अटकेपार अगदी हिंदुकुश पर्वत पर्यंत (म्हणजे आज चे अफगाणिस्तान )पेशवाई ची सत्ता आणली तर पूर्व कडे कटक पर्यंत राज्य केले या सर्व राज्य कारभार ची भाषा मराठी ची होती हिंदी भाषा अगदी अलीकडे म्हणजे 1857 च्या उठाव नंतर प्रचलित झाली मध्यप्रदेश राज्या ची तर मराठी ही 1956 पर्यंत राजभाषा होती कारण तेथील होळकर, शिंदे, तांबे, नेवाळकर (झाशी ची राणी )हे सर्व मराठी सरदार, हिंदी भाषेला फार मोठा इतिहास नाही पण 750 वर्षा पूर्वी संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा पवित्र ग्रंथ मराठी भाषेत लिहिला त्या आधी 1400 वर्ष पेक्षा जास्त असणाऱ्या चांगदेव महाराज नी इस पूर्व लिखाण केले आहे, परम पूज्य चक्रधर स्वामी चा काळातील ग्रंथ रचना ही मराठी भाषेत तील च , प्रसिद्ध कारल्या लेणी मध्ये ही मराठी भाषा सापडते म्हणूनच मराठी भाषेचे वय हे 2220 वर्षा पेक्षा जास्त च आहे. माहिती संकलन नितीन पांडे, अध्यक्ष मनमाड सार्वजनिक वाचनालय.मराठी भाषा दिना निमित्ताने संकल्प करा,मराठीतच बोला, मराठीतच लिहा,मराठीचा गर्व करा मराठी भाषा दिना निमित्ताने सर्वाना शुभेच्छा


अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ – चांदवड येथील अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस – शासनाने त्वरित दखल घेण्याची मागणी

बघा व्हिडिओ – चांदवड येथील अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस – शासनाने त्वरित दखल घेण्याची मागणी

चांदवड - चांदवडला कांदा प्रश्नी डॉक्टर श्याम पगार यांचे अन्नत्याग आंदोलनचा आजचा चौथा दिवस असून...

read more
बघा व्हिडिओ-गंगाधरी गावात ७० फुट खोल विहिरीत उतरूण सर्प मिञाने उदमांजराला जीवदान दिले

बघा व्हिडिओ-गंगाधरी गावात ७० फुट खोल विहिरीत उतरूण सर्प मिञाने उदमांजराला जीवदान दिले

  नांदगाव: मारूती जगधने नांदगांव नजिक गंगाधरी येथे विहीरीत पडलेल्या उदमांजराला पशुप्रेमीनी/...

read more
बघा व्हिडिओ – विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने पंतप्रधान मोदी यांची घेतली भेट

बघा व्हिडिओ – विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने पंतप्रधान मोदी यांची घेतली भेट

विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान...

read more
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना योजनेच्या पारदर्शक, गतिमान अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये युगपुरुष स्वामी विवेकानंद स्मृतीदिनानिम्मत विनम्र अभिवादन.

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये युगपुरुष स्वामी विवेकानंद स्मृतीदिनानिम्मत विनम्र अभिवादन.

  मनमाड:-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये युगपुरुष स्वामी विवेकानंद...

read more
चार चोरट्यांच्या मुसक्या आवळत चोरीच्या २३ दुचाकी हस्तगत – मनमाड पोलिसांची दमदार कामगिरी

चार चोरट्यांच्या मुसक्या आवळत चोरीच्या २३ दुचाकी हस्तगत – मनमाड पोलिसांची दमदार कामगिरी

मनमाड - मनमाड शहर पोलिसांनी मोठी चोरीच्या २३ दुचाकी जप्त ४ जणांना अटक करत मोठी कामगिरी केली आहे....

read more
.