loader image
[ays_poll id=7]

मराठी भाषा दिनानिमित्त गंगाधरी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांशी बाल साहित्यिक संदीप देशपांडे यांनी साधला ऑनलाईन संवाद

Feb 28, 2023

मराठी भाषा दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळेवस्ती गंगाधरी येथे लेखक तुमच्या भेटीला हा विशेष कार्यक्रम संपन्न झाला यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून बालसाहित्यिक, कवी , लेखक , पत्रकार श्री. संदिपजी देशपांडे सर यांच्याशी डिजिटल साधनांचा वापर करून ऑनलाईन संवाद साधण्यात आला . अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मुलांसाठी कथाकथन करणारे बालसहित्यिक मुलांना ऑनलाईन भेटायला आले त्यामुळे ग्रामीण भागातील मुले हरखून गेली.यावेळी संदीप देशपांडे यांनी कविता ,विविध किस्से,मनोरंजक ज्ञानवर्धक माहिती देऊन विद्यार्थ्यांची मने जिंकली. मराठी राजभाषा दिनाचे महत्व आपल्या सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना पटवून दिले . तसेच कवीवर्य कुसुमाग्रज यांच्या अक्षरबाग मधील कविता ही सादर केल्या .मुलांकडून गाऊन घेतल्या.
यावेळी कु. वैष्णवी कर्नर , कु.चैताली भागवत, कु.कन्हैया वाघमोडे , कु.मानसी ठोंबरे , या विद्यार्थ्यांनी देशपांडे सरांना साहित्या संबधीत प्रश्न विचारले आणि देशपांडे सरांनी ही दिलखुलास पणे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. व साहित्या संबधित मार्गदर्शन ही केले तसेच यावेळी त्यांनी

” सहाच्या घरी दहा गेले .
सहाच्या घरात दहाच मावले .
बाकी सारे दारात बसले ” ,
” फणस संत्रे आगगाडीत बसले ” शाळा माझी सुंदर यासह विविध बालकवितासह अनेक कविता ही विद्यार्थ्यांना ऐकविल्या . या बालकविता विद्यार्थ्यांनी उस्फूर्त पणे ऐकल्या. आणि आनंदीत झाले . या वेळी देशपांडे सरांनी विद्यार्थ्यांचे तसेच शिक्षकांचे ही कौतुक केले. तसेच
विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला उत्तर देतांना काही पुस्तक वाचना सुचविले.यात साहित्य अकादमी दिल्ली पुरस्कार प्राप्त ” जोकर बनला किंगमेकर ” ,
आमचा बाप आणि आम्ही ,
थांबणारे ढगोबा ,
शब्दांची नवलाई , आदी विविध पुस्तके वाचनास सुचविले.
. याकार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये साहित्याची आवड निर्माण होण्यास मदतच होणार आहे. तसेच वाचनाची प्रेरणा मिळेल याकार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार गोरख जाधव यांनी मानले .

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

छप्पन महाभोग (महानैवेद्य) कार्यक्रमाचे आयोजन संपन्न गणेश भक्तांचा उदंड प्रतिसाद मनमाड - आम्ही...

read more
नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नांदगाव : मारुती जगधने नांदगांव तालुक्यातील जिल्हा बँकेचे कर्ज घेतलेल्या व थकित झालेल्या ९...

read more
मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या पदव्युत्तर...

read more
भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - आम्ही परंपरा पाळतो... आम्ही संस्कृती चे रक्षण करतो.... हे ब्रीद घेऊन मनमाड शहरात धार्मिक...

read more
मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

सुवा फिजी येथे १४ ते २१ सप्टेंबर २०१४ रोजी होणाऱ्या कॉमनवेल्थ चँपियनशिप साठी महाराष्ट्रातील एकमेव...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका मुलाखती दरम्यान काँग्रेस भारतात सत्तेत आल्यास आरक्षण काढून टाकू...

read more
कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

नांदगांव : दि १३ मारुती जगधने दि.13 सप्टेंबर 2024 नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम...

read more
.