loader image
[ays_poll id=7]

मेडिकव्हर हॉस्पिटल येथे ‘ओपन-हार्ट’ ला पर्यायी ‘ कीहोल बायपास सर्जरी’ यशस्वी

Feb 28, 2023


प्रतिनिधी : नाशिक कीहोल हार्ट सर्जरी ज्याला मिनिमली इनव्हेसिव्ह कार्डियाक सर्जरी (MICS ) असेही म्हणतात, ही एक प्रकारची हृदय शस्त्रक्रिया आहे जी पारंपारिक ओपन-हार्ट शस्त्रक्रियेऐवजी छातीत लहान चीरांद्वारे केली जाते . या प्रकारची शस्त्रक्रिया पारंपारिक शस्त्रक्रियेपेक्षा वेगळी तर आहेच परंतु यामुळे रुग्णाला अनेक फायदे होतात ,ज्यामध्ये कुठलेही हाड फ्रॅक्चर न होणे, शस्त्रक्रिये नंतर शरीरावर कोणताही व्रण न दिसणे , हॉस्पिटलमध्ये कमी काळ आणि कमी कालावधीत बरे होणे समाविष्ट आहे.
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी कीहोल बायपास शस्त्रक्रिया झालेल्या श्री नागनाथ, वय ६५ वर्ष (गोपनीयतेसाठी नाव बदलले आहे). यांना त्यांच्या कोरोनरी धमन्यामध्ये अडथळा असल्याचे निदान होण्यापूर्वी अनेक महिने छातीत दुखणे आणि श्वासोच्छवासाचा त्रास होत होता. यामुळे त्यांनी अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल चे वरिष्ठ कार्डिओलॉजिस्ट डॉ सुधीर शेतकर यांचा वैद्यकीय सल्ला घेण्याचे ठरवले. काही चाचण्या आणि अँजिओग्राफी केल्या नंतर असे निर्दशनास आले कि , हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या मुख्य धमनी च्या तोंडाशी ब्लॉक आहेत. आणि अँजिओप्लास्टी ऐवजी रुग्णास बायपास सर्जरी करणे योग्य असेल असे सुचवले. रुग्णाला मेडिकव्हर हॉस्पिटल मधील अत्यंत अनुभवी मिनिमली इनव्हेसिव्ह कार्डियाक सर्जन डॉ मनीष पुराणिक यांच्या कडे रेफर करण्यात आले जे गुंतागुंतीची व अति जोखमीच्या हृदय शस्त्रक्रिया तज्ञ आहेत. ते छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद ) मेडिकव्हर हॉस्पिटल येथे मिनिमली इनव्हेसिव्ह कार्डियाक सर्जन म्हणून कार्यरत आहेत. अशा पद्धतीच्या शस्त्रक्रिया ते नित्य करतात.
डॉ. मनीष पुराणिक यांनी हि शस्त्रक्रिया कुठलेही हाड फ्रॅक्चर न करता किंवा पूर्ण छाती न उघडता दोन फासळ्यांमधून अगदी लहान चिर देऊन दुर्बिणीच्या साह्याने केली आहे. हि शस्त्रक्रिया अति प्रगत समजल्या जाणाऱ्या ऍनेस्थेशिया टेक्निक, रिजनल ऍनेस्थेशिया तसेच विशेष उपकरणांच्या मदती ने केली जाते. या पद्धतीने शस्त्रक्रियेमुळे कोरोनरी धमनी मधील अडथळे यशस्वीपणे दूर करण्यात आणि त्यांच्या हृदयात रक्त प्रवाह पूर्ववत करण्यासाठी बायपास ग्राफ्ट करण्यात यशस्वी झाले. या संपूर्ण प्रक्रियेला सुमारे तीन तास लागले. या पद्धतीच्या शस्त्रक्रियेमुळे रुग्णाला वेदनारहित शस्त्रक्रियेचा अनुभव घेता येतो. या पद्धतीने एक पासून 4 ते 5 ब्लॉक्स ची बायपास, हृदयातील छिद्र एक किव्वा दोन वाल्व बदलणे ई. हृदय शस्त्रक्रिया करणे शक्य आहे. अशी माहिती डॉ पुराणिक यांनी दिली. श्री नागनाथ यांना शस्त्रक्रियेनंतर दोन दिवस हॉस्पिटलच्या कार्डियाक केअर युनिटमध्ये निरीक्षणाखाली ठेवण्यात आले, त्यांची प्रकृती उत्तम व हृदयाची गती सुरळीत असल्याची खात्री झाल्यानंतर त्यांना शस्त्रक्रियेनंतर तीन दिवसांनी रुग्णालयातून सोडण्यात आले. त्यांना काही आठवडे दैनंदिन कामे सहजतेने घेण्याचा सल्ला देण्यात आला.
शस्त्रक्रियेनंतर सहा आठवड्यांनंतर त्यांच्या फॉलो-अप अपॉईंटमेंटमध्ये, श्री नागनाथ यांना खूप बरे वाटत असल्याचे सांगितले आणि लहान चीरांमधून कमीत कमी व्रण दिसत आसल्याने त्यांना आनंद झाला. डॉ. मनीष पुराणिक यांनी काही नियमित चाचण्या केल्या आणि श्री नागनाथ यांचे हृदय सामान्यपणे काम करत असल्याची पुष्टी केली.
एकंदरीत, श्री. नागनाथ कार्डियाक कीहोल शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि ते निरोगी हृदयासह आणि जीवनाच्या चांगल्या दर्जासह सामान्य व्यक्ती प्रमाणे दैनंदिन कामकाज करू लागले. या वेदनारहित कीहोल हृदय शस्त्रक्रियेचा लाभ जास्तीत जास्त रुग्णांनी करून घ्यावा असे आवाहन केंद्र प्रमुख समीर तुळजापूरकर यांनी केले.
________
अशोका मेडीकव्हर हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांकडून एकाच छताखाली योग्य ते निदान व उपचार केले जातात. ज्या रुग्णांना शस्त्रक्रिया किंवा हॉस्पिटलमध्ये दाखल होऊन औषधोपचारांची गरज असेल त्यांच्यासाठी तज्ञ डॉक्टरांच्या आणि उच्च शिक्षित वैद्यकीय स्टाफ च्या देखरेखेखाली उपचार केले जातात. आधुनिक सुखसोयी आणि तंत्रज्ञान यांचा जोड असलेले अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल हे रुग्णांसाठी सर्वसमावेशक पर्याय म्हणून काम करत आहे
– डॉ सुशील पारख , मेडिकल डायरेक्टर तथा बालरोग तज्ञ् , अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक)


अजून बातम्या वाचा..

लेदर बाॅल टी 20 स्पर्धेत मनमाड अंडर 14 संघाचा नांदगाव अंडर 14 संघावर विजय – अर्धशतकीय हसन शेख सामनावीर

लेदर बाॅल टी 20 स्पर्धेत मनमाड अंडर 14 संघाचा नांदगाव अंडर 14 संघावर विजय – अर्धशतकीय हसन शेख सामनावीर

  मनमाड - शनिवार 31 ऑगस्ट 2024, भुमी क्रिकेट अकॅडमी व श्री.गुरुगोबिंद सिंग हायस्कूल आयोजीत...

read more
साहिल जाधव ने पटकावले सुवर्णपदक जयराज परदेशी ला रौप्यपदक अनिरुद्ध अडसुळे ला कांस्यपदक

साहिल जाधव ने पटकावले सुवर्णपदक जयराज परदेशी ला रौप्यपदक अनिरुद्ध अडसुळे ला कांस्यपदक

छत्रपती संभाजी नगर येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय युथ ज्युनियर सीनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत...

read more
.