Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

सर्व सामान्यांना होळी पूर्वीच महागाईचा चटका – घरगुती गॅस सिलेंडर ५० रुपयांनी महागले

Mar 1, 2023

मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना महागाईचा मोठा फटका बसला आहे. महिन्याच्या पहिल्याच दिवशी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. होळीपूर्वी देशातील सर्वसामान्यांना पुन्हा एकदा महागाईची झळ बसली आहे.
14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ झाली आहे. तर, 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत 350.50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. वाढलेले दर आजपासून लागू झाले आहेत.
8 महिन्यांनंतर घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या असून यापूर्वी 1 जुलै रोजी घरगुती सिलेंडरच्या किमतींत वाढ झाली होती. त्यामुळे गेल्या वेळी जुलैमध्ये घरगुती गॅस सिलेंडरच्या दरांत वाढ करण्यात आली होती आणि त्यानंतर व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली असली तरी घरगुती सिलेंडरच्या किमती मात्र स्थिर होत्या. आज घरगुती आणि व्यावसायिक दोन्ही सिलेंडर्सच्या दरांत वाढ करण्यात आली आहे.

अजून बातम्या वाचा..

राज्यस्तरावर आघाडी एकत्रच लढणार मात्र जिल्हास्तरावर स्थानिक परिस्थतीनुसार लढविल्या जातील निवडणुका : अजित पवार

राज्यस्तरावर आघाडी एकत्रच लढणार मात्र जिल्हास्तरावर स्थानिक परिस्थतीनुसार लढविल्या जातील निवडणुका : अजित पवार

येत्या काही दिवसात महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा धुरळा उडणार आहे. या...

read more
जिल्हापरिषद – प.स निवडणूक : गट- गण रचनेचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने केला जाहीर

जिल्हापरिषद – प.स निवडणूक : गट- गण रचनेचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने केला जाहीर

ओबीसींच्या राजकीय आरक्षणच्या कारणावरून पुढे ढकलण्यात आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका...

read more
नांदगाव तालुका पातळीवरील कबड्डी स्पर्धेत कुमार गटात भारतमाता क्रीडा मंडळ तर किशोर गटात समता क्रीडा मंडळ अंतिम विजेते

नांदगाव तालुका पातळीवरील कबड्डी स्पर्धेत कुमार गटात भारतमाता क्रीडा मंडळ तर किशोर गटात समता क्रीडा मंडळ अंतिम विजेते

मनमाड येथील महर्षी भगवान वाल्मिकी बॉईज क्रीडा मंडळ आयोजित नांदगाव तालुका पातळीवरील कबड्डी स्पर्धेत...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]