loader image
[ays_poll id=7]

विधिमंडळ हे तर चोर मंडळ ; संजय राऊत यांचे वादग्रस्त विधान – हक्कभंगाची कारवाई होणार ?

Mar 1, 2023


विधीमंडळ हे तर ‘चोर’मंडळ आहे, असं वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना गट आणि भाजपवर निशाणा साधताना केल्याने राऊतांच्या याच वक्तव्यावरुन आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी गदारोळ झाला. राऊत यांच्या वादग्रस्त विधानानंतर भाजप आणि शिवसेना गटाचे आमदार आक्रमक झाले आहेत. भाजप नेते अतुल भातखळकर यांनी संजय राऊतांवर विधीमंडळ सभागृहात हक्कभंग आणण्याची मागणी केली आहे. दरम्यान, गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले होते.

संजय राऊतांनी चोरमंडळ उल्लेख केल्यानंतर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी आज त्यांच्याविरोधात हक्कभंग आणण्याची मागणी केली. त्यांच्या मागणीला अनुमोदन देताना शिवसेनेचे भरत गोगावले यांनीही त्यांना अपशब्द वापरला. राऊतांच्या वक्तव्यासंदर्भात बोलताना अपशब्द वापरल्यानंतर ठाकरे गटाच्या रवींद्र वायकर यांनी आक्षेप घेत गोगावलेंना सुनावले. या मुद्द्यावरुन सभागृहात गदारोळ झाला.
महाराष्ट्रात विधीमंडळ हे तर ‘चोर’मंडळ, असं म्हणत संजय राऊतांनी शिंदे गट आणि भाजपवर थेट निशाणा साधला आहे. बनावट शिवसेनेने पदावरून काढलं तरी आम्ही पक्ष सोडणार नाही, असंही संजय राऊत यांनी बोलताना ठणकावून सांगितलं आहे. एकनाथ शिंदे म्हणतात बेळगाव प्रकरणी ते तुरुंगात गेले. त्यांनी त्याची कागदपत्रं दाखवावीत, असं आव्हानही ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

संसदेत पक्षनेतेपदावरुन काढून टाकण्यासंदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले की, “टाकू द्या. बनावट शिवसेना आहे, ड्युप्लिकेट. चोरांचं मंडळ… विधीमंडळ नाही ‘चोर’मंडळ आहे. त्यांनी आम्हाला पदावरुन काढले तरी आम्ही पक्ष सोडणार नाही. अशी अनेक पदं आम्हाला पक्षाने, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी दिली. जी आम्ही ओवाळून टाकतो पक्षासाठी. आम्ही लफंगे नाही. पदे गेली तरी परत येतील, आमचा पक्ष महत्त्वाचा आहे.”


अजून बातम्या वाचा..

“संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजना” अंतर्गत नांदगाव तालुक्यासाठी ऊस तोड पालकांच्या मुलांसाठी शासकीय वसतिगृह मंजूर

“संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजना” अंतर्गत नांदगाव तालुक्यासाठी ऊस तोड पालकांच्या मुलांसाठी शासकीय वसतिगृह मंजूर

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या पाठपुराव्याने नांदगाव तालुक्यातील ऊस तोड कामगार पालकांच्या...

read more
श्री गणेश ज्वेलर्सचे बुधवारी उद्घाटन – सिने अभिनेत्री गिरिजा प्रभु प्रमुख आकर्षण

श्री गणेश ज्वेलर्सचे बुधवारी उद्घाटन – सिने अभिनेत्री गिरिजा प्रभु प्रमुख आकर्षण

सुमारे दोन दशकांपासून मनमाड शहर आणि परिसरातील ग्राहकांसाठी सोने,चांदीच्या दागिन्यांच्या विविध...

read more
आ.सुहास अण्णा कांदे व सौ अंजुम कांदे यांच्या हस्ते मनमाड शहरात विविध विकास कामांचे भूमिपूजन

आ.सुहास अण्णा कांदे व सौ अंजुम कांदे यांच्या हस्ते मनमाड शहरात विविध विकास कामांचे भूमिपूजन

  मनमाड - रविवार 14/01/2024 मनमाड शहरात नगरोत्थान विकास विभागाच्या योजनेअंतर्गत विकास कामांचे...

read more
जि.प.प्राथमिक शाळा साकोरे येथे तालुकास्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न

जि.प.प्राथमिक शाळा साकोरे येथे तालुकास्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न

नांदगांव : मारुती जगधने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साकोरे येथे तालुकास्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष...

read more
.