loader image
[ays_poll id=7]

सेंट झेवियर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी अनुभवला मतदान प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव

Mar 2, 2023


मनमाड :येथील सेंट झेवियर हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना लोकशाहीतील मतदान प्रक्रियेचा अनुभव देण्यात आला. त्यासाठी प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली . उमेदवारी फॉर्म भरणे, माघार घेणे, चिन्ह वाटप, प्रचार अशा क्रमवार प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्यात. श्री. स्वप्नील बाकळे सर यांनी निवडणूक प्रक्रिया प्रमुख म्हणून काम पाहिले
तर सर्वश्री सुधाकर कातकडे, अरविंद दळवी,अजिंक्य जाधव, सौ. ज्योती वाघ मॅडम,डॅनियल जगधने यांनी सहकार्य केले. तर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शाळेचे मुख्याध्यापक फादर मॅल्कम नातो यांनी काम पाहिले. तसेच विजयी उमेदवारांची नावे घोषित करून त्यांचे अभिनंदन नाही केले. सदरच्या निवडणूकीत शाळा नायक, शाळा नायिका तसेच क्रीडा नायक व क्रीडा नायिका या पदासाठी एकूण 16 विद्यार्थी उमेदवार म्हणून उभे होते. इयत्ता सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांना मतदान करण्याचा अधिकार देण्यात आला होता ओळखपत्रासाठी विद्यार्थ्यांकडे असलेली शाळेची दैनंदिनी प्रमाण मानण्यात आली. मतदान करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बोटावर शाई लावण्यात आली.शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला.या ऑनलाइन निवडणूक प्रक्रियेची संपूर्ण प्रणाली तयार करण्यासाठी ब्रदर वेन्सिल ब्रदर इन्फंट, ब्रदर योहान यांनी विशेष सहकार्य केले.


अजून बातम्या वाचा..

आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून माणिकपुंज धरणावरून नव्या जलवाहिनी साठी दोन कोटी रुपये मंजूर

आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून माणिकपुंज धरणावरून नव्या जलवाहिनी साठी दोन कोटी रुपये मंजूर

माणिकपुंज धरण ते नांदगाव येथील जलकुंभ येथे होणाऱ्या पाणीपुरवठा साठीची जलवाहिनी सतत फुटत असल्यामुळे...

read more
नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाचा कार्यक्षम खासदार पुरस्कार डॉ.भारती पवार आणि कार्यक्षम आमदार पुरस्कार सुधीर मुनगंटीवार यांना प्रदान

नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाचा कार्यक्षम खासदार पुरस्कार डॉ.भारती पवार आणि कार्यक्षम आमदार पुरस्कार सुधीर मुनगंटीवार यांना प्रदान

183 वर्षा वर्षाची परंपरा असलेल्या नाशिकच्या सार्वजनिक वाचनालय या संस्थेद्वारे माजी आमदार आणि...

read more
.