loader image
[ays_poll id=7]

सेंट झेवियर हायस्कूल मध्ये कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

Mar 2, 2023

मनमाड : येथील सेंट झेवियर हायस्कूल मध्ये कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांची जयंती मराठी राजभाषा दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक फादर मॅल्कम नातो, पर्यवेक्षिका सिस्टर ज्योत्स्ना, विद्यार्थी प्रतिनिधी पूजा डगळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांनी कुसुमाग्रजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. तर कुमारी पूजा डगळे या विद्यार्थिनीने कुसुमाग्रज यांचा जीवनपट आपल्या भाषणातून उघडून दाखवला. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय मुख्याध्यापक फादर मॅल्कम यांनी मराठी भाषेबद्दल गौरवास्पद अशी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तनया मुळे हिने केले तर आभार प्रदर्शन आर्यन उगले या विद्यार्थ्याने केले. त्याचबरोबर भूषण बिडगर व शितल साळवे यांचेही या कार्यक्रमास विशेष सहकार्य लाभले. इयत्ता पाचवी ड च्या विद्यार्थ्यांनी वर्ग शिक्षिका श्रीमती सरिता देवरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ माय मराठी’ हे गीत सादर केले. तर इयत्ता आठवीच्या वर्गातील मुलांनी वर्गशिक्षिका सौ. लीना जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सर्वात्मका शिवसुंदरा ‘ही प्रार्थना सादर केली

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड, प्रतिनिधी, ता. २८ – मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास...

read more
सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...

read more
.