loader image
[ays_poll id=7]

कर्मवीर भाऊसाहेब हिरे बहुजनांचे उध्दारक – प्राचार्य डॉ.अरुण पाटील

Mar 3, 2023

मनमाड – कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांनी स्वातंत्र्यपूर्वीच्या कालखंडामध्ये बहुजन हिताय बहुजन सुखाय हे महात्मा फुले आणि महात्मा गांधी यांचे ब्रीद घेऊन सामाजिक चळवळीतून जनसामान्य बहुजनांचा, शेतकरी, कामगार आणि दलितांचा उद्धार केला, त्यांच्या कार्यामुळे ते खऱ्या अर्थाने महात्मा फुलेंचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आणि महात्मा गांधींच्या विचारांचे वारसदार ठरतात आणि हा वैचारिक वारसा आपल्या कृतीतून त्यांनी समाजाच्या विकासातून दाखवला असे प्रतिपादन महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,मनमाडचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांनी केले.
मनमाड महाविद्यालयात कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांची ११८ वी जयंती बुधवार ता. ( १) रोजी साजरी करण्यात आली त्यानिमित्ताने कर्मवीरांना अभिवादन करताना डॉ. पाटील बोलत होते.यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य जी. एन. शेंडगे, कुलसचिव समाधान केदारे, कनिष्ठ विभागाच्या उपप्राचार्य ज्योती पालवे , व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्राध्यापक पि.के. बच्छाव , मिलिंद आहिरे ग्रंथपाल राहुल लोखंडे ,डॉ. आरती छाजेड आदी यावेळी उपस्थित होते डॉ. पाटील पुढे म्हणाले की बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना ,कामगारांना त्यांच्या रोजच्या जगण्याचे ,व मूलभूत गोष्टींचे अनेक प्रश्न भेडसावत होते .या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक कर्मवीरांनी केली. म्हणूनच त्यांनी १९४५ साली आदिवासी सेवा समितीची स्थापना केली, तसेच संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला १९५२ साली महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयाची स्थापना मालेगावला केली आणि या महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांना त्यांनी आमंत्रित केले. होते डॉ.पाटील यांनी यावेळी कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांचे राजकारण तसेच महसूल मंत्री असताना त्यांनी निर्माण केलेला कुळ कायदा, सहकारातील अनेक गोष्टीची यावेळी माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मनोगत महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ. पवनसिंग परदेशी यांनी केले. डॉ. परदेशी यांनीही कर्मवीरांच्या जीवन चरित्रावर कार्यक्रमातून प्रकाश टाकला तसेच आभार प्रदर्शन डॉ. परदेशी यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

मनमाड – भारतमाता क्रीडा मंडळ आधारस्तंभ व माजी खेळाडू १९९१ महा कुंभमेळा भरतीतील भारतमाता क्रीडा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू कोठ्यातून भरती झालेले आहे

मनमाड – भारतमाता क्रीडा मंडळ आधारस्तंभ व माजी खेळाडू १९९१ महा कुंभमेळा भरतीतील भारतमाता क्रीडा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू कोठ्यातून भरती झालेले आहे

श्री मंगेश दराडे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती आज पार पडलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदोन्नती...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे 2005 पासून सलग 20 व्या वर्षी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व क्रांतीवीरांना आदरांजली देणे साठी बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी= अखंड भारत दिना =निमित भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

मनमाड - मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सन 2005 पासून भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व ज्ञात अज्ञात...

read more
मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

कपिल वस्तू बुद्ध विहारात सुरू असलेल्या वर्षावास कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मावळत्या अध्यक्षा...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड - धार्मिक /सामाजिक कार्यात अथवा कोणत्याही शुभ कार्यात प्रसन्नता येणे साठी रांगोळी काढण्यात...

read more
नांदगाव तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विजयी

नांदगाव तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विजयी

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
.