loader image

सीसीटीव्ही कॅमेऱ्याला चुना फासून दान पेटीतील रक्कम चोरीला – सप्तशृंगी गड येथील घटना

Mar 4, 2023


लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वणीच्या सप्तशृंगी देवी गडावरील मंदिरात दानपेटीतून चोरी झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सप्तशृंगी देवी मंदिराच्या दानपेटीवर चोरट्यांचा डल्ला मारला आहे. विशेष म्हणजे सीसीटीव्ही कॅमेऱ्याला चुना फासत ही चोरी करण्यात आली आहे. दानपेटीत भाविकांनी टाकलेल्या अनेक नोटा जळालेल्या अवस्थेत मिळून आल्या आहे. सुरक्षारक्षक व सीसीटीव्ही असतांना देखील चोरी झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

१३ फेब्रुवारीला चोरीची ही घटना घडली होती आणि ती घटना घडून जवळपास २० दिवस उलटल्यानंतर समोर येत आहे आणि २० दिवस उलटूनही अद्याप गुन्हा दाखल नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याबाबतीत अद्याप गुन्हा दाखल नसून विश्वस्त ऍड. दीपक पाटोदकर यांनी संस्थान अध्यक्षांना तात्काळ गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पत्र दिले आहे.

१३ फेब्रुवारीला चोरीची घटना घडली होती. सीसीटीव्ही कॅमेऱ्याला चुना फासत ही चोरी करण्यात आली आहे. दानपेटीत भाविकांनी टाकलेल्या अनेक नोटा जळालेल्या अवस्थेत मिळून आल्या आहे. सुरक्षारक्षक व सीसीटीव्ही असतांना देखील चोरी झाली आहे. त्यामुळे गडावरील संरक्षणावर प्रश्न उपस्थित होत आहे. या बद्दल आता कधी गुन्हा दाखल होतो आणि काय पाऊले उचलली जातात ह्या कडे भाविकांचे लक्ष लागले आहे.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.